आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि फक्त उद्धव ठाकरेच- \'सामना\'तून भाजपला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, अशी गर्जना आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. शिवसैनिक हीच खरी आमची ताकद आहे व या ताकदीवर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार आहोत. मोदी यांच्या रूपाने दिल्लीच्या तख्तावर एक मजबूत पंतप्रधान लाभला. आता महाराष्ट्राच्या मजबुतीचा विडा उचलून शिवसेनेने विजयाचा बेलभंडारा उचलला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नांना गरुडभरारी लाभण्यासाठी शिवसैनिकांनो, तुम्हीही गरुडझेप घ्या! आता राज्य शिवसेनेचेच येणार आहे अशी भीमगर्जनाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. याचबरोबर यातून मित्रपक्ष भाजपला सूचक इशारा दिला आहे.
शिवसेनेचा आज 48 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने लिहलेल्या अग्रलेखात आता शिवसेनेचाच पर्यायाने उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असे सर्वांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'आता राज्य भगव्याचेच! चला, महाराष्ट्र जिंकूया!!' या अग्रलेखात म्हटले आहे की, आज महाराष्ट्राच्या भाग्यविधात्या शिवसेनेचा 48 वा वर्धापन दिन. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सोहळे दरवर्षी होतच असतात. नवे निश्‍चय, नवे संकल्प त्यानिमित्ताने होत असतात, पण यावेळचा संकल्प महाराष्ट्रावर भगवी विजयी पताका फडकविण्याचा आहे. शिवसेनेने अन्यायाविरुद्ध लढायचं, महाराष्ट्राला बळ देण्यासाठी द्वाही पुकारायची आणि दळभद्री कॉंग्रेसवाल्यांनी त्यावर गुळण्या टाकायच्या. याचा अंत होण्याची वेळ आता आली आहे. ‘या हिंदुस्थानवर हिंदुत्वाचा जबरदस्त तेजपुंज भगवा फडकू दे! म्हणजे सत्ता काय असते, न्याय कशाला म्हणतात हे दाखविण्याची संधी मिळेल,’ असे स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले. ते पूर्ण झाले आहे. आता वेळ आहे महाराष्ट्राचा उद्धार करण्याची असे अग्रलेखात म्हटले आहे.
पुढे वाचा, भाजपला इशारा आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंच...