आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena And Congress Claim Of Opposition In Maharashtra State Assembly.

दबाबतंत्र: शिवसेना विरोधी बाकांवर बसणार? ‍विधानसभा सचिवांकडे पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात भाजपने अल्पमतात सरकार स्थापन केले असून शिवसेनेने भाजपची कोंडी करण्‍याची पूर्ण तयारी केली आहे. शिवसेना विरोधी बाकांवर बसण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. शिवसेनेने विरोधी पक्षपदावर दावा केला असून आज (सोमवारी) विधानसभा सचिवांकडे औपचारिक पत्र पाठवले आहे. एवढेच नाही तर शिवसेनेने विरोधीपक्ष नेतेपदासाठी एकनाथ शिंदे यांची ‍निवड केल्याची माहिती मिळाली आहे. विरोधीपक्ष पदाचा दावा केल्यानंतरही शिवसेना बुधवारपर्यंत (12 नोव्हेंबर) भाजपच्या उत्तराची वाट पाहाणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

आता भाजपच्या भूमिकेची प्रतिक्षा...
भाजपकडून शिवसेनेला कोणत्याही अद्याप सकारात्मक संकेत मिळालेले नाही. तरी देखील शिवसेना बुधवारपर्यंत भाजपच्या उत्तराची वाट पाहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

12 नोव्हेंबरला फडणवीसांची परीक्षा...
येत्या 12 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परीक्षा आहे. बुधवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. तसेच अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल.

शिवसेनेने भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्यास नेण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्‍ट केले आहे.

असे आहे जागांचे गणित...
288 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपसह घटक पक्षाचे 123 आमदार, शिवसेनेचे 63 आणि राष्ट्रवादीचे 41 तर कॉंग्रेसचे 42 आमदार आहेत. बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता आहे. फडणवीस सरकारला 23 आमदारांची आवश्यकता आहे.

दुसरीकडे, काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा सांगितला असून विधिमंडळात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी सचिवांकडे पत्र सादर केले आहे.

दरम्यान, शिवसेनेनंतरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचा क्रमांक लागतो. शिवसेना सत्तेत जाते की विरोधात बसते, अशी सद्यस्थितीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या गोटात धाकधूक सुरु झाली आहे. शिवसेनेने जर भाजपशी युती केली नाही तर विरोधीपक्ष नेतेपदाच्या स्पर्धेत काँग्रेस मागे पडण्याची शक्यता आहे. तरीदेखील दिल्लीत झालेल्या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने कॉंग्रेसने विधानसभेच्या गटनेतेपदी माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची तर उपनेतेपदी आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेसने आज (सोमवारी) दोन्ही नेत्यांची नावेही जाहीर केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, भगवे फेटे बांधून विधानसभेत पोहोचले शिवसेनेचे सर्व आमदार...