आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम शुक्लांचा शिवसेनेला \'जय महाराष्ट्र\'; घेतली अमित शहांची भेट, भाजपात जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम शुक्ला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहांची भेट घेतली. - Divya Marathi
प्रेम शुक्ला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहांची भेट घेतली.
मुंबई- शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'ची हिंदी ‘दोपहर का सामना’ या वृत्तपत्राचे माजी कार्यकारी संपादक प्रेम शुक्ला लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्ला यांनी भेट घेतली असून, शुक्ला काही दिवसात भाजपात अधिकृत प्रवेश करणार आहेत.
वरिष्ठ पत्रकार असलेल्या प्रेम शुक्ला यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या‘सामना’ची हिंदी आवृत्ती म्हणजेच ‘दोपहर का सामना’च्या कार्यकारी संपादकपदाचा 31 डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर सामनाने त्यांना तत्काळ मुक्त केले होते. भाजपात प्रवेश करण्यासाठीच प्रेम शुक्ला यांनी सामना व शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रेम शुक्ला हे राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडत असत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा व हिंदुत्ववादाचा पुरस्कार करताना प्रेम शुक्ला भाजपवर हल्ला चढवत असत. त्यामुळेच ते भाजपच्या नजरेत भरले. भाजपचे महामंत्री रामलाल यांच्याशी शुक्ला यांचे पूर्वीपासूनच चांगले आहेत. त्यातच मुंबईतील भाजपच्या काही दूतांनी प्रेम शुक्ला यांना अमित शहांपर्यंत पोहचवले. शिवसेनेत राहून तुम्हाला काहीही राजकीय भवितव्य नाही त्यापेक्षा भाजपात या तुम्हाला जमेल तशी संधी देऊ असे सांगत अमित शहांनी शुक्लांना गळाला लावल्याचे बोलले जात आहे. मराठी आवृत्तीतील सामनातून संजय राऊत भाजपवर हल्लाबोल करीत असतात तर प्रेम शुक्ला हिंदी आवृत्तीच्या माध्यमातून भाजपवर टीकेचे बाण सोडत असत. भाजपला ही टीका वर्मी लागते. म्हणूनच त्यांनी शुक्ला यांना फोडण्याचा प्रयत्न केला व त्यात त्यांना यशही आले आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार संजय निरूपम यांनीही दहा वर्षापूर्वी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. संजय निरूपम यांना बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभेची खासदारकी दिली होती. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत सेनेला धोका दिला होता. आता प्रेम शुक्ला यांनीही निरूपम यांची री ओढत भाजपात प्रवेश केला आहे. संजय निरूपम यांचा अनुभव पाहता उद्धव ठाकरेंनी प्रेम शुक्ला यांना सामनापुरतेच मर्यादित ठेवले होते. मात्र, राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी शुक्लांना डिबेटमध्ये बोलवण्यास सुरुवात केली व त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा बळावली. यातूनच ते भाजपच्या गळाला लागले. भाजपलाही सेनेचा मोहरा फोडल्याचा आनंद वाटत आहे.
पुढे वाचा, शुक्लांना भाजपात काय भविष्य राहील...
बातम्या आणखी आहेत...