आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena's Dasara Rally On Shivaji Part, Court Give Permission

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवरच, न्यायालयाची सशर्त परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवरच होणार आहे. आवाजाची मर्यादा पाळावी व ध्वनियंत्रणा एकाच ठिकाणी ठेवू नये, अशी अट घालत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या मैदानावर मेळावा घेण्याची शिवसेनेला परवानगी दिली .


दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली 47 वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात हा पहिलाच मेळावा असल्याने त्याकडे पक्षातील सर्व नेते, कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, गतवर्षीप्रमाणे महापालिकेने यंदाही शिवसेनेला या मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी दिली नव्हती. हे मैदान शांतता क्षेत्रात येत असून केवळ खेळासाठी राखीव असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतर्फे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गतवर्षीच शिवसेनेला पर्यायी मैदानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. तो मुद्दा यंदा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने एमएमआरडीएच्या मैदानाचे 70 लाख रुपये भाडे परवडत नसल्याचा युक्तिवाद केला होता. अखेर न्यायालयाने शिवसेनेची विनंती मान्य करत कायद्याचे उल्लंघन न करता मेळावा घेण्याचे निर्देश दिले. आदेशाचे पालन होते की नाही, याची देखरेख एक समिती करणार आहे.