आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena\'s New Political Agenda On Hindutavada, Critcis On Modi

देशात मुस्लिमांचा टक्का वाढतोय! मोदी, समान नागरी कायदा आणा- उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतात मुस्लिमांची संख्या वाढते आहे. मुस्लिम लोकसंख्या याच ‘बुलेट ट्रेन’ वेगाने वाढत राहिली तर पुढच्या पंचवीस वर्षांत या देशात लोकसंख्येच्या बळावर आणखी एका पाकिस्तानच्या मागणीस बळ मिळेल. मुस्लिमांनी देशाचा कायदा पाळावा, कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा हे देशाच्या पंतप्रधानांनी ठणकावून सांगण्याची हीच वेळ आहे. मनमोहन यांनी जी चूक केली तीच चूक विद्यमान पंतप्रधानांनी करू नये. यावर मात करण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज आहे व देश वाचविण्याचा हाच एकमेव तोडगा आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त मुसलमानांच्या दारावर खट...खट...खट! शीर्षकाखाली लिहलेल्या अग्रलेखात मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करून याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, मुसलमानांची लोकसंख्या वाढल्याने देशाचा भाषिक, भौगोलिक व भावनिक समतोल बिघडेल व त्यामुळे देशाच्या एकात्मतेस तडे जातील याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा. मुसलमानांनी देशाचा कायदा पाळावा, कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा हे देशाच्या पंतप्रधानांनी ठणकावून सांगण्याची हीच वेळ आहे. मुसलमानांनी अर्ध्या रात्री जरी हाक मारली तरी मदतीस धावण्याचे वचन पंतप्रधान मोदी यांनी दिले, पण त्या बदल्यात मुसलमान समाज देशाच्या मदतीस धावणार आहे काय? देशाला गरज आहे सक्तीच्या कुटुंब नियोजनाची व लोकसंख्यावाढीस आळा घालण्याची. लोकसंख्येचा भस्मासुर वाढतो आहे व त्या भस्मासुराच्या डोक्यावर हिरव्या चांदतार्‍याची टोपी व कमरेवर हिरवी लुंगी आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. संघाच्या शिलेदारांनी ‘स्वकीय’ सरकारवर दबाव वाढवून सर्वधर्मीयांसाठी सक्तीचे कुटुंब नियोजन लादायला हवेत असे रोखठोक मत अग्रलेखात मांडले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, धर्म म्हणून लोकसंख्या जाणीवपूर्वक वाढवून रक्तहीन क्रांतीने देश काबीज करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे, पण हिंदुत्वाचा टिळा लावलेले काही पुढारी म्हणतात त्याप्रमाणे मुसलमानांची लोकसंख्या वाढते म्हणून हिंदूंनीदेखील पोरांचे लटांबर वाढवून लोकसंख्या वाढवावी हा त्यावरचा उपाय नाही. संघाच्या शिलेदारांनी ‘स्वकीय’ सरकारवर दबाव वाढवून सर्वधर्मीयांसाठी सक्तीचे कुटुंब नियोजन लादायला हवे. या देशाला लोकपालापेक्षा सगळ्यात जास्त या समान नागरी कायद्याची गरज आहे. ‘घरवापसी’ वगैरे प्रयोग ज्यांना करायचे आहेत त्यांना आमचा विरोध नाही, पण इस्लामी आक्रमण रोखण्याचा व इस्लामी बॉम्ब ‘निकामी’ करण्याचा हा उपाय नाही. हे उपाय म्हणजे आग रामेश्‍वरी व बंब सोमेश्‍वरी असे आहेत. धर्मांध मुसलमान या देशाचा नागरिक म्हणून नव्हे तर मुसलमान म्हणून जगतात. हे चुकीचे आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत असे जर येथील मुस्लिमांनी मानले तर नागरिक म्हणून देशहिताचे कायदे त्यांनीही पाळायलाच हवेत, अशी अपेक्षा मुस्लिमांकडून व्यक्त केली आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने आणखी काय काय म्हटले आहे अग्रलेखात...