आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात सेनेचा राडा, कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न फसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फ्रेंडशिप फोरमने आयोजित केलेल्या पाकिस्तानी छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात मंगळवारी शिवसैनिकांनी गोंधळ घालत कार्यक्रम उधळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. लेखक अाणि पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते.

पाकमधील मलिका अब्बास, फराह मेहबूब, आमेन जे., मोबेने अन्सारी आणि माल्कन हचेसन हे पाच छायाचित्रकार गेल्या सात दिवसांपासून मुंबईत आहेत. या छायाचित्रकारांनी त्यांच्या कॅमेऱ्यात मुंबईची छायाचित्रे टिपली आहेत. या सर्व छायाचित्रांचे तस्वीर-ए-मुंबई आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी कराचीत टिपलेल्या तस्वीर-ए-कराची अशी दोन स्वतंत्र प्रदर्शने दोन्ही देशांत भरवण्यात येणार आहेत. १४ १५ आॅगस्ट रोजी म्हणजेच दोन्ही देशांच्या स्वतंत्रतादिनी हे प्रदर्शन मुंबई कराचीमध्ये आयोजित केले जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

ही पत्रकार परिषद चालू असताना दोन शिवसैनिक अचानक उठले त्यांनी घोषणाबाजी केली. गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कुलकर्णी पत्रकार भवनबाहेर पडताच त्यांची गाडी रोखून निदर्शने करण्याचा शिवसैनिकांचा डाव होता. त्यासाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसले होते. मात्र, पोलिसांनी कुलकर्णी यांना पत्रकार भवनच्या मागील दारातून गाडी नेण्याचे आवाहन केले. त्यामुळे शिवसैनिकांचा यात गाडी अडवण्याचा डाव फसला.
बातम्या आणखी आहेत...