आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena's Upeksha Patil Become Ullasnagar's New Mayor

उल्हासनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील, विधानसभेच्या तोंडावर मोठे यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील यांनी बाजी मारत इंदिरा उदासी यांचा 5 मतांनी पराभव केला आहे. शिवसेना-भाजप-रिपाई-मनसे-अपक्ष अशा सर्वपक्षीय विरोधकांच्या युतीच्या उमेदवार असलेल्या सेनेच्या अपेक्षा पाटील यांना 38 मते मिळाली तर, इंदिरा उदासी यांना 32 मते मिळाली. या निवडणुकीच्या मतदानाला 5 नगरसेवक गैरहजर राहिले.
2012 साली उल्हासनगरमध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाई, साईपक्ष, बसपा आणि अपक्ष यांची महायुती झाली होती. या महायुतीत प्रथम महापौरपद साई पक्षाच्या नगरसेविका आशा इदनानी यांना मिळाले होते. सव्वा वर्ष असा महापौरचा कार्यकाळ ठरलेला होता. मात्र त्यानंतरही इदनानी यांनी महापौरपद सोडले नाही. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता हे पद इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाले होते. त्यामुळे हे पद शिवसेनेच्या वाट्याला देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
मात्र, त्याचेवळी राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महापौर आशा इदनानी आणि त्यांचे पती जीवन इदनानी यांनी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झालेल्या गुप्त समझोत्यानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. या समझोत्यानुसार विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्योती कलानी यांना साई पक्षाने पाठिंबा देऊन महापालिकेत महापौर, उपमहापौर व इतर महत्त्वाचे पद स्वतकडे खेचण्याची रणनिती आखली होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, साई पक्ष, बसपा, मनसे व अपक्ष नगरसेवक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
अखेर शिवसेना-भाजप-मनसे-रिपाई-अपक्ष महायुतीकडून उभे राहिलेल्या सेनेच्या अपेक्षा पाटील यांनी इंदिरा उदासी यांच्यावर 5 मतांनी मात केली. असे असले तरी 5 नगरसेवक निवडणुकीसाठी गैरहजर राहिल्याने शिवसेनेचा महापौर बनू शकला. विधानसभेच्या तोंडावर उल्हासनगर शहरात शिवसेनेसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे.