आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणारे Tweet करुन डेंनी करुन घेतली \'शोभा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्त लेखिका शोभा डे पुन्हा एकदा ट्विट करुन चर्चेत आल्या आहेत. मंगळवारी मुंबई महापालिकेसाठी मतदान झाले. यावेळी डे यांनी एका पोलिसाचा फोटो ट्विट केला. त्यासोबत लिहिले, 'मुंबईत आज हेवी बंदोबस्त आहे.' त्यावर मुंबई पोलिसांनीही ट्विट करुन खुलासा केला आहे. 'आम्ही मिस डे यांच्या शब्दांचा सन्मान करतो. मात्र त्यांनी जो फोटो पोस्ट केला आहे तो चुकीचा आहे. पोलिस जवान आणि त्याचा यूनिफॉर्म दोन्ही मुंबई पोलिसचे नाही. तुम्ही एका जबाबदार नागरिकाप्रमाणे वागा.'  
 
फोटोत मध्य प्रदेशचा पोलिस जवान 
- शोभा डे यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांना चिमटा घेतला आहे. 
- तर्क वाचस्पतीने लिहिले, तुम्ही जर फोटो झुम करुन पाहिला तर एमपी पोलिसचा बॅज स्पष्ट दिसतो. अशा नॉन्सेन्स पोस्ट करु नये. 
- ऑफिस ऑफिस अकाऊंटने ट्विट केले की, हा यूनिफॉर्म मुंबई पोलिसांचा तर दिसत नाही. एखाद्या दुसऱ्या राज्यातील किंवा शहरातील असला पाहिजे. 
- मुंबई पोलिसांनी लिहिले, 'आम्ही मिस डे यांच्या शब्दांचा सन्मान करतो. मात्र त्यांनी जो फोटो पोस्ट केला आहे तो चुकीचा आहे. पोलिस जवान ज्या ड्रेसमध्ये आहे तो मुंबई पोलिसांचा यूनिफॉर्म नाही. आम्हाला आशा आहे की तुम्ही एका जबाबदार नागरिकाप्रमाणे वागाल.'
- काहींनी शोभा डे यांचे समर्थनही केले आहे. 

पुढील स्लाइडवर वाचा, 2017 चा संकल्प शांत राहा, Tweets बंद करा, सुषमांना टारगेट करणार्‍या शोभा डेंवर ट्विट राईट्स खवळले... आणि पाहा, डे यांनी ट्विट केलेला एका पोलिसाचा फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...