आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooter Short Documentary Announced Best In May Mumbai Mahotsav

माय मुंबई महोत्सवात 'शूटर' लघुपट ठरला सर्वोत्कृष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - युनिव्हर्सल मराठी व महाराष्‍ट्रराज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात येणा-या ‘माय मुंबई’ महोत्सवाच्या दुस-या पर्वात आंतरराष्‍ट्रीय प्रवर्गात दिग्दर्शक तेजस जोशी यांचा ‘शूटर’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. या वेळी गीतकार मंगेश कांगे, छायाचित्रकार कौस्तुभ पाध्ये, दादा मांजरेकर, राज्य सांस्कृतिक संचालक आशुतोष घोरपडे यांची उपस्थिती होती.


महोत्सवात जगभरातून दाखल 170 पैकी निवडक 54 लघुपट पाहण्यासाठी अनेक तरुणांनी हजेरी लावली होती. इराण व अमेरिका येथील लघुपटांनी महोत्सवात पहिल्यांदाच सहभाग नोंदवला. विशेष महिला प्रवर्गासाठी ‘लेफ्ट टू राइट’ने बाजी मारली, तर बे्रकिंग न्यूज फिल्मसाठी प्रसाद नामजोशी यांनी सर्वोत्कष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला. या वेळी ‘पाणउतारा’ पुस्तकाचे लेखक व दैनिक ‘दिव्य मराठी’चे उपसंपादक भारत देवगावकर यांचाही सन्मान करण्यात आला.


सर्वोत्कृष्ट ठरलेले लघुपट
लघुपट दिग्दर्शक
दादू किरण साष्टे
पेहल स्टलवर्ट्स प्रॉडक्शन
नाइट शिफ्ट शुधांशू डिचवलकर
डेअरी मिल्क निशांत काणेकर
शूटर तेजस जोशी
लेफ्ट टू राइट रवींद्र भगवती