आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारासाठी लघुपटांचा फंडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडी अन् महायुतीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी अजूनही जागांचे वाटप चर्चेच्या गुºहाळात अडकलेले आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी अजूनही यादी फायनल झालेली नाही. असे असले तरी इच्छुक उमेदवार मात्र जय्यत तयारीला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट भेट अभियानाबरोबरच एसएमएससारखे अद्ययावत तंत्रही आता नवीन राहिलेले नाही. त्यामुळे काही अतिउत्साही इच्छुकांनी आपल्या कार्याचे लघुपट तयार करून त्यांच्या सीडीचे वाटप केले जात आहे.
गेल्या पाच वर्षात शिवसेना-भाजपने मुंबईत केलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘करून दाखवले’ या नावाने शिवसेनेने एक लघुपट तयार केला आहे. हा लघुपट प्रत्येक वॉर्डात दाखवण्यात येणार आहे. यावरूनच प्रेरणा घेऊन घाटकोपर येथील दोन मनसे इच्छुकांनी आपापल्या कामांचा लघुपट तयार केला आहे. राष्टÑवादीही यात मागे नसून एका उमेदवारानेही आपल्या कर्तृत्वाचा लघुपट बनविण्याची तयारी केली असल्याने लघुपट तयार करणाºया एजन्सीज्चा व्यवसाय भरभराटीला आला आहे. सद्य:स्थितीत उमेदवारी मिळणार अशी खात्री असलेले सर्वच प्रमुख पक्षाचे सुमारे 20 ते 25 नगरसेवर लघुपट बनवण्यास उत्सुक असून संबंधित एजन्सीज्ला तशी आॅर्डरही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सदर एजन्सीज्च्या सूत्रांनी सांगितले की, सध्या आम्ही तीन उमेदवारांच्या लघुपटाचे काम पूर्ण केले आहे. या उमेदवारांना अजून तिकीट मिळालेले नाही; परंतु उमेदवारी मिळणार याची 100 टक्के खात्री असल्याचा दावा करतच त्यांनी लघुपट तयार करण्याची आॅर्डर दिली आहे. या लघुपटात त्यांनी आपल्या विभागात केलेल्या कामाची सचित्र माहिती देण्यात आली असून उमेदवाराचीही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. उमेदवाराची मुलाखत, निवडून आल्यास करण्यात येणाºया कामांची जंत्री देणारी आश्वासनेही या लघुपटात आहे. हा लघुपट विभागातील प्रत्येक घरात सीडीद्वारे वाटप करण्याबरोबरच प्रचार सभेच्या ठिकाणीही दाखविण्यात येणार आहे.
50 हजारांपर्यंत खर्च
एक लघुपट तयार करण्यास साधारण 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये चित्रीकरण करण्याबरोबरच एडिटिंग, व्हॉईस ओव्हर आणि डबिंग मिक्सिंग आणि एडिटिंग स्टुडियोचा खर्च समाविष्ट आहे. मात्र ज्यादा सीडींचा खर्च यात समाविष्ट नाही. अगोदरच एडिटिंगचे भरपूर काम
असल्याने एडिटिंग स्टुडियो रिकामे नाहीत त्यामुळे रविवारी वा रात्री उशिरापर्यंत एडिटिंग स्टुडियोमघ्ये लघुपटाचे काम करण्यात येत आहे.
तिळगूळ घ्या... गोड गोड बोला
निवडणूक आयोगाने यंदा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात वाढ केली असली तरी एकदम 40-50 हजार रुपयांचा खर्च उमेदवाराला निवडणूक खर्चात दाखवावा लागणार आहे. दुसरीकडे काही उमेदवारांनी वॉर्ड घोषित होताच आपल्या विभागातील सर्व मतदारांना एसएमएसद्वारे मकर संक्रांतींच्या शुभेच्छा देऊन आपला प्रचार सुरु केला आहे. यामध्ये शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आघाडीवर आहेत.