आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrad Pawar To Far give To Maharashtra Public For Ajit Pawar\'s Statement

पुतण्याच्या बेताल वक्तव्याबद्दल काकांनी मागितली माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्वाच्य भाषेत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचे काका अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. जनतेची माफी मागितल्याचे शरद पवार यांनी 'ट्विटर'च्या माध्यमातून सांगितले आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा ‘टगेगिरी’ दाखवून दिली होती. इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी खालच्या पातळीवर उतरत दुष्काळ आणि दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली. ‘तो एक कोण देशमुख 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय.. पाणी सोडलं? पाणी नाही काय सोडता.. मुतता का तिथं आता?... अवघड आहे बाबा...पाणी प्यायला मिळंना, तर लघवी पण होईना,’ अशा अर्वाच्य भाषेत अजितदादांनी दुष्काळग्रस्तांची टर उडवली होती.

अजित पवारांच्या बेताल वक्तव्या मुळे शरद पवार व्यथित झाले असून रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शरद पवार यांनी ट्विट करून अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या उडवलेल्या खिल्ली माफी मागितली आहे.

दुसरीकडे, इंदापूर येथील सभेतील वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल जनतेची माफी मागत असल्याचे अजित पवार यांनी काढलेल्या माफीनाम्यात सांगितले आहे.

राज्‍यातील जनतेला दुष्‍काळाच्‍या झळा बसत असताना खालच्‍या पातळीवर जाऊन बोलणा-या अजित पवारांना महाराष्‍ट्र निश्चितच जागा दाखवेल. यापुढे पवारांना राज्‍यात मत नाही तर फक्‍त मूत मिळेल, अशा खरपूस शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली. महाराष्‍ट्र दौ-यादरम्यानग जळगाव येथील सागर पार्कवर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.