आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवा हवाईचे प्रभुदेवासोबत ठुमके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘इंग्लिश विग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये सक्रिय होत आहे. जुलै महिन्यात मकाऊ येथे होणा-या ‘आयफा 2013’ सोहळ्यात ती डान्सिंग किंग प्रभुदेवासोबत काही गाण्यावर थिरकून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. विशेष म्हणजे स्टेजवर ती अनेक वर्षांनंतर दिसणार आहे.
याबाबत श्रीदेवी म्हणाली, अनेक वर्षानंतर स्टेजवर नृत्य करण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे डान्सिंग स्टार प्रभुदेवासोबत नृत्य करण्याची संधी मिळत असल्याने मी अतिशय आनंदी आहे. प्रभुने अनेक चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली आहे. त्याने तयार केलेली अनेक गाणी तुफान हिट झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयफात माझी त्याच्यासोबत वर्णी लागली हे माझे भाग्य समजत असल्याचे ती म्हणाली. सोहळ्यात ती प्रभुदेवसासोबत तिच्या हिट ‘हवा हवाई’ या गाण्याबरोबर प्रभुदेवाने केलेल्या ‘मुकाबला’ या गाण्यावर नृत्य करणार आहे. त्यामुळे यंदाच्या सोहळ्याची रंगत काही औरच असणार आहे. मकाऊ येथे 4 जुलै रोजी हा सोहळा रंगणार आहे.
तीन दशकानंतर चित्रपट
श्रीदेवीने सुमारे तीन दशकानंतर ‘इंग्लिश विग्लिश’ हा चित्रपट केला. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले होते. त्यानंतर तिने ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटातही एक महत्त्वपूर्ण
भूमिका केली होती.
लग्नाआधी श्रीदेवीने ‘जुदाई’ या चित्रपटात आपली जादू दाखवली होती. त्यानंतर बोनी कपूर यांच्याशी विवाह झाल्याने ती सुमारे 26 वर्ष चित्रपटांपासून दूर होती. मात्र, गेल्या काही वर्षापासून श्रीदेवी पुन्हा एकदा कोणत्या न कोणत्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये सक्रिय होताना
दिसत आहे.

जान्हवी सध्याच चित्रपटात नाही
श्रीदेवी व बोनी कपूर अनेक सोहळ्यात आपल्या मुलींना सोबत घेऊन जात असतात. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी जान्हवी लवकरच बॉलीवूडमध्ये पर्दापण करणार असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर श्रीदेवी म्हणाली, जान्हवी सध्या लहान आहे. त्यामुळे इतक्यात ती चित्रपटात काम करणार नाही. तिच्या बॉलीवूड पदार्पणाची माहिती आम्ही स्वत: देऊ असेही श्रीदेवीने सांगितले.