आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shri Siddhivinayak Trust Take Patent On Ladu Prasad

श्री सिद्धिविनायक ट्रस्ट घेणार लाडूप्रसादाचे ‘पेटंट’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोट्यवधी भाविकांचे र्शद्धास्थान असणार्‍या श्री सिद्धिविनायक ट्रस्टने भाविकांना प्रसादरूपाने देण्यात येणार्‍या लाडूंचे पेटंट घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे लाडू मंदिर समितीच्या सुसज्ज किचनमध्ये व प्रशिक्षित व्यक्तींकडून तयार केले जातात. भाविकांना अत्यल्प किमतीत म्हणजे केवळ 10 रुपयांत दोन लाडूंचा प्रसाद दिला जातो. मात्र, मंदिर परिसरातील काही मिठाई दुकानदार ‘सिद्धिविनायक प्रसाद’ म्हणून भाविकांची फसवणूक करत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी ट्रस्टने पेटंटसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबईसह राज्यभरातील असंख्य भाविक श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला नियमित येत असतात. अमिताभ बच्चनसह बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीज व राज्यातील मातब्बर नेतेही या विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी नियमित हजेरी लावत असतात. मंगळवार, संकष्ट चतुर्थी व गणेशोत्सवात तर भाविकांची अलोट गर्दी होत असते. या मंदिरात येणार्‍या भाविकांना 10 रुपयांत दोन लाडू प्रसाद म्हणून दिले जातात. सिद्धिविनायकाच्या या प्रसादाचे आता पेटंट घेण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. त्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करून कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली.

दररोज सुमारे 40 हजार भाविक दर्शनासाठी येतात, त्यापैकी 10 हजार भाविक प्रसाद घेत असतात. दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थीला भाविक संख्या तब्बल दीड लाखापर्यंत जाते, तर गणेशोत्सवाच्या काळात दररोज 2 लाखांहून अधिक भाविक मंदिरात येत असतात. मंदिर परिसरातील काही मिठाई विक्रेते ‘सिद्धिविनायकाचा प्रसाद’ म्हणून लाडूची विक्री करतात व भाविकांकडून जादा पैसे उकळतात. उत्सवाच्या काळात तर प्रसादाचा ‘काळाबाजार’ही होतो. र्शद्धेच्या नावावर होणारा हा गैरप्रकार रोखण्यासाठीच ट्रस्टने प्रसादाचे पेटंट घेण्याचा निर्णय घेतला आहे.


दररोज 40 हजार लाडू


‘एफएडी’कडून तपासणी
अन्न व औषध प्रशासनाकडून त्याची तपासणीही करून घेतलेली असते.
शुद्ध तूप, चणा डाळ, साखर, शेंगदाणे व विलायचीचा यासाठी वापर केला जातो.

65 हजार लाडूंचे दर मंगळवारी वाटप

36 प्रशिक्षित आचार्‍यांमार्फत


खरा प्रसाद ट्रस्टचाच
मंदिरातून मिळणारे लाडूच खर्‍या अर्थाने ‘प्रसाद’ म्हणून भाविकांना भावतात. मिठाईच्या दुकानांतून प्रसाद म्हणून घेतलेले लाडू सुमार दर्जाचे असतात. ते मंदिरातील प्रसादाची बरोबरी करूच शकत नाहीत. हा दोन्ही लाडूंमध्ये मोठा फरक आहे, असा दावा मंगेश शिंदे यांनी केला.


‘तिरुपती’ने घेतले पेटंट
कोट्यवधी भाविकांचे र्शद्धास्थान असलेले आंध्र प्रदेशातील तिरुपती- तिरुमला देवस्थानने काही वर्षांपूर्वी प्रसादाचे पेटंट करून घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी मंदिर परिसरातच भाविकांना अत्यल्प दरात व दर्जेदार लाडूंचा प्रसाद उपलब्ध होऊ शकतो. तसेच या पेटंटमुळे ‘तिरुपती प्रसादम्’च्या नावाखाली इतर दुकानदारांकडून होणारी ‘दुकानदारी’ थांबवण्यात यश आले आहे. बालाजीच्या दर्शनासाठी दररोज सुमारे 50 हजारांहून अधिक भाविक येत असतात. येथील प्रसादाच्या लाडूचे वजन प्रत्येकी 100 ग्रॅम असते. भाविकांना एक लाडू मोफत तर कमाल दोन लाडू विकत मिळतात.


फसवणूक टळेल
एकदा ट्रस्ट्रच्या नावाने पेटंट मिळाल्यास इतर कोणालाही ‘सिद्धिविनायकाचा प्रसाद’ म्हणून लाडूंची विक्री करता येणार नाही. त्यामुळे आपसूकच भाविकांची लूट थांबेल, हे सांगतानाच मंदिर ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रसाद अत्युच्च दर्जाचा असतो, असा दावाही शिंदे यांनी केला.


सेलिब्रिटिजची गर्दी
अंगारिका चतुर्थीच्या दिवशी सुमारे 15 ते 30 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. गेल्या दोन वर्षातील भक्तांची संख्या याच आकडेवारीच्या जवळपास आहे. यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारखे सेलिब्रिटीज, बडे राजकीय नेते यांचाही समावेश असतो.