आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रुती बडोलेने घेतला शिष्यवृत्तीचा अर्ज मागे; वाघमारे मात्र मुलाच्या शिष्यवृत्तीवर ठाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आर्थिक स्थिती चांगली असतानाही केवळ नियमाचा लाभ घेत आपल्या पाल्यांना परदेशात शासकीय शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी आपल्या पाल्यांना परदेशी पाठवण्याचा घाट घातला. मात्र माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती मागे घेत असल्याचे गुरुवारी जाहीर केले. दुसरीकडे, दिनेश वाघमारे यांनी मात्र माझ्या मुलाला नियमाप्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली असून ती नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितले. 
श्रुती बडोलेने गुरुवारी सकाळी मुख्य सचिव सुमित मलिक यांना ईमेलद्वारे आपण शिष्यवृत्तीचा अर्ज मागे घेत आहोत असे कळवले. त्यानंतर मुख्य सचिवांनी संबंधित पत्र सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे पाठवले. 

श्रुतीचे मुख्य सचिवांना पत्र: माझ्यात गुणवत्ता आहे, माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय? 
मुख्य सचिवांना पत्र लिहिल्यानंतर श्रुती बडोलेने खुलासा देत म्हटले की, माझ्यात गुणवत्ता आहे आणि माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय? मी आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केले तेव्हा माझे वडील मंत्री नव्हते. युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये मी एमएस्सी पूर्ण केले. त्याठिकाणी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झाले. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली (सरकारी नव्हे). अवकाश संशोधनात काम करायचे  हे माझे स्वप्न होते त्यानुसार मी एक एक पायरी चढत गेले तीही गुणवत्तेनुसारच, त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. अॅस्ट्रो फिजिक्स या विषयात जगातल्या पहिल्या २६व्या विद्यापीठात माझी निवड झाली. ती गुणवत्तेनुसार. या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा हे मी ठरवले आहे. कर्ज काढून शिक्षण घेणार नाही हे मी बाबांना आधीच सांगितले होते. याचे कारण एवढेच की यापूर्वी भावाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते आम्ही अजूनही भरत आहोत.

मला यापूर्वी गुणवत्तेनुसार विदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिली. परंतु पीएचडीसाठी शिष्यवृत्तीची या विद्यापीठात सवलत नाही. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे. मी याच विद्यापीठात प्रवेश घेता यावा म्हणून मी राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. (जगातील पहिल्या १०० विद्यापीठात प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलीही आर्थिक निकषांची अट नाही, असा जीआर आहे.) ‘पीएचडी इन सायन्स’साठी राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीकरिता तीन जागा आहेत. त्यासाठी केवळ २ अर्ज आलेत. त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. तर मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? असा प्रश्न करीत श्रुतीने  म्हटले की, जगातील पहिल्या १०० विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थीक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीच नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझे यापूर्वीचे शिक्षण गुणवत्तेनुसार झाले आहे. आता वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? आम्ही कुणाचाही हक्क कधीही डावलला नाही आणि कधी डावलणार नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे. पण मी शिकणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचे शिक्षणासाठीचे स्वप्न साकार करण्यासाठी अवकाश संशोधनात जाणारच असेही श्रृतीने स्पष्ट केले.

दुसरीकडे, दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, माझ्या मुलाला नियमाप्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली आहे. शिष्यवृत्ती मागे घ्यावी म्हणून माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. फक्त माध्यमांचाच दबाव आहे. परंतु आम्ही शिष्यवृत्ती परत करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...