आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddhart Jadhav Become Brand Ambesidor Of Smoking Free State

अभिनेता सिद्धार्थ जाधव व्यसनमुक्तीचा राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याची महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती कार्याचा प्रचार करण्यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. सामाजिक न्यायमंत्री मोघे यांनी बुधवारी ही माहिती दिली. एका विदेशी मद्याच्या जाहिरातीसाठी लाखो रुपयांची ऑ फर आली होती, पण धूम्रपानाचे समर्थन करणारी जाहिरात आपण करणार नाही, अशी ठाम भूमिका घेत सिद्धार्थने ती नाकारली होती.

सिद्धार्थ हा सामाजिक बांधिलकी असणारा अभिनेता आहे. म्हणूनच त्याला निवडल्याचे मोघे म्हणाले. मी 16 वर्षे झोपडपट्टीत राहिलो. तेथेच मोठा झालो. तरी आपल्याला व्यसन लागले नसल्याचे सिद्धार्थ या वेळी म्हणाला. सिनेमात मी दारुड्याची भूमिका केली, परंतु तो माझा खरा चेहरा नसून खासगी आयुष्यात मी कसा वागतो त्याचेच युवकांनी अनुकरण करावे, असे आवाहनही सिद्धार्थने केले.