आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धिविनायक, शिर्डी ट्रस्टकडून गावे दत्तक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळमुक्तीसाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी तब्बल ४०० कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले. त्यासाठी मुंबईच्या श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टसह काही उद्योजकांनी पुढाकार घेतला. यातून राज्यातील ४०० गावे दत्तक घेतली जाणार आहेत.

योजनेत दरवर्षी हजार गावे दत्तक घेतली जाणार आहेत. यातील ३४ गावांना सिद्धिविनायक ट्रस्टने ३४ कोटी जाहीर केले. ट्रस्टचा आदर्श पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांची बैठक घेऊन मदतीचे आवाहन केले. बैठकीत ३० उद्योजकांनी ४०० गावे दत्तक घेण्याचे जाहीर केले आणि ४०० कोटींचा निधी उभा राहिला. योजनेत पाच वर्षांत २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दरवर्षी ८५०० कोटी खर्च येत असून यंदा अर्थसंकल्पात हजार कोटींची तरतूद आहे. उर्वरित ३५०० कोटी कसे उभारायचे ही चिंता सरकारला होती. मात्र ट्रस्ट उद्योजकांच्या पुढाकाराने मार्ग निघाला. सिद्धिविनायक शिर्डी ट्रस्टने ३४ जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक गाव दत्तक घेतले. महिंद्रा, आरसीएफ, फोक्सवेगन, एलएनटी, रिलायन्स अशा प्रमुख उद्योजकांनी उर्वरित ३३२ गावे दत्तक घेण्याचे जाहीर केले.

उद्योजकांना आवाहन
सध्यासरकारची मदत सोडून ४०० कोटी जमा झाले असले, तरी आणखी ३१०० कोटी लागणार आहेत. सर्व उद्योजकांनी पुढे येण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करण्यात येईल, असे या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कंपनीला वर्षाला सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत सामाजिक कामांना निधी देण्याचा नियम आहे. हा निधी या योजनेसाठी कंपन्या वापरणार आहेत. गावांची यादी अंतिम होताच कंपन्यांना त्यांची गावे कळवली जातील. कंपन्यांना मंदिर ट्रस्टना माहितीतील गरजू गावे सुचवण्याची मुभा आहे, हे विशेष.