आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धिविनायकाचे दर्शन कॉफी टेबल बुकमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केवळ मुंबईच नव्हे तर जगभरातील गणेशभक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराचे अनोखे रूप कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून गणेश भक्तांसमोर येणार आहे. प्रख्यात हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी सिद्धिविनायक मंदिराची विविध कोनातून आणि विविधप्रसंगी काढलेल्या छायाचित्रांनी हे कॉफी टेबल बुक सजले असून त्याचे प्रकाशन मंगळवारी विशेष समारंभात होणार आहे.

गोपाळ बोधे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, सिद्धिविनायक मंदिरात मी नेहमी जातो आणि त्याची विविध रूपे माझ्या कॅमेर्‍यात मी बंदिस्त केलेली आहेत. सिंदूर लेपनापासून फुलांची आरास, फळांच्या रसात गणेशमूर्तीला स्थान, पहाटेची काकड आरती ते शेजारतीपर्यंतच्या विविध टप्प्यांची छायाचित्रे मी काढलेली आहेत.

हेलिकॉप्टरमधूनही मी या मंदिराची अनेक छायाचित्रे काढलेली आहेत. ही सर्व छायाचित्रे गणेशभक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या कॉफी टेबल बुकची रचना केली आहे. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हे कॉफी टेबल बुक तयार करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी सिद्धिविनायक मंदिरातून या कॉफी टेबल बुकची दिंडी काढून रवींद्र नाट्य मंदिर येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या प्रांगणात प्रकाशन करण्यात येणार आहे.

सिद्धिविनायकाची 270 छायाचित्रे व इतिहास
270 रंगीत छायाचित्रांनी सजलेल्या ‘श्री सिद्धिविनायक- अनन्यसाधारण ऊर्जा’ या कॉफी टेबल बुकची संकल्पना गोपाळ बोधे यांचीच असून या पुस्तकात सिद्धिविनायक मंदिराचा इतिहासही देण्यात आला आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर, गॅझेटियर विभागाचे संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक, भाषा अभ्यासक डॉ. ज्ञानेश्वरी तळपदे यांचे संशोधनपर लेखही या पुस्तकात आहेत. सिद्धिशक्ती पब्लिकेशन आणि श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने याची निर्मिती करण्यात आली आहे.