आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - किडनीच्या आजारांनी त्रस्त असणा-या रुग्णांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे स्वस्तात उपचार मिळणार आहेत. नियमित डायलिसिस घेण्यासाठी त्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. मात्र, ट्रस्टतर्फे केवळ 250 रुपयांत (एका वेळेसाठी) सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिसेंबरपासून या सेवेला सुरुवात होणार आहे.
अनेक सामाजिक कार्यांमध्ये हातभार लावणा-या सिद्धिविनायक ट्रस्टने मंदिराजवळील इमारतीच्या तिस-या मजल्यावर अद्ययावत सुविधांनी युक्त असे डायलिसिस केंद्र सुरू केले आहे. येथे एका वेळी 22 रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. या कार्यासाठी ट्रस्टला श्री वीरा देसाई जैन संघ ही संस्था साहाय्य करणार आहे. रुग्णांकडून अत्यल्प शुल्क घेऊन उर्वरित रक्कम मंदिर आणि संस्थेतर्फे देण्यात येणार असल्याचे वीरा देसाई जैन संघ ट्रस्टचे ट्रस्टी चेतन व्होरा यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत मुंबईमध्ये किडनीच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नियमित डायलिसिस घ्याव्या लागणा-या रुग्णांसमोर (आठवड्यातून तीनदा) आर्थिक समस्या निर्माण होते. खासगी रुग्णालयात सध्या एका डायलिसिससाठी सुमारे 1200 ते 1500 रुपयांपर्यंत खर्च येतो. किडनीचा आजार असणा-या 100 रुग्णांपैकी केवळ 5 जणांना किडनी प्रत्यारोपण शक्य होते. इतर रुग्णांना नियमितपणे डायलिसिस घेण्याशिवाय पर्याय नसतो; पण सर्वांनाच हा खर्च परवडत नाही. माफक दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाल्याने या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.