आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अार्थिक विकास साधण्यासाठी सीमेवर शांतता हवी- सीमेलिएह; राष्ट्रीय प्रबाेधिनी दीक्षांत समारंभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अार्थिक विकास साधण्यासाठी  सीमेवर शांतता असणे अावश्यक असून त्यासाठी सैन्यदलाचे याेगदान महत्त्वपूर्ण अाहे. देशाची एकात्मता अाणि अखंडता कायम राहण्यासाठी सैन्यदल कार्यरत असते. लष्करी शिस्तीबद्दल समाजात माेठे अाकर्षण असून जवानांना देशाचे भविष्य म्हणून पाहिले जात असल्याची भावना केंद्रीय लाेकसेवा अायाेगाचे अध्यक्ष डेव्हिड अार सीमेलिएह यांनी बुधवारी व्यक्त केली.    


खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीच्या (एनडीए) १३३ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ बुधवारी पार पडला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. या वेळी एनडीएचे कमांडट एअर मार्शल जसजितसिंग क्लेर, रिअर अॅडमिरल एस.के. ग्रिवल, प्राचार्य प्रा. अाेमप्रकाश शुक्ला उपस्थित हाेते. या वेळी विज्ञान शाखेचे कमांडंट राैप्यपदक गुरुवंशसिंह गाेसल याला मिळाले, तर संगणक विज्ञान शाखेचे कमांडंट राैप्यपदक अनमाेल अग्रहरी अाणि कला शाखेचे कमांडंट राैप्यपदक राहुल बिष्ट याला मिळाले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एकूण २५० विद्यार्थ्यंाना पदवी प्रदान करण्यात अाली. यात विज्ञान शाखेचे ५६, संगणक विज्ञान शाखेचे १४६ व कला शाखेच्या ४८ विद्यार्थ्यंाचा समावेश असून यामध्ये १२ परदेशी विद्यार्थी अाहेत.    
सीमेलिएह म्हणाले, तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण एनडीएतील कॅडेट पूर्ण करून देशसेवेसाठी सज्ज झाले अाहेत. ही कॅडेटसह त्यांच्या पालकांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब अाहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळी नवीन अाव्हाने समाेर येत असून त्यांची उकल करण्यासाठी अाधुनिक ज्ञान कॅडेटने अात्मसात करावे. अाधुनिक ज्ञान प्राप्त करणे ही काळाची गरज असून अापत्कालीन परिस्थितीत काैशल्याचा वापर शस्त्रासारखा करता येऊ शकताे.   , असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...