आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नल यंत्रणेत बिघाड, मुंबईचा उत्तर भारताशी रेल्वे संपर्क तुटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्टेशनमधील सिग्नल यंत्रणा जळाल्यामुळे आठवडाभर ठप्प असलेली मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवार आणि शुक्रवारी मुंबई-पुण्यातून उत्तर भारतात जाणार्‍या, येणार्‍या लांब पल्ल्याच्या तब्बल ५९ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले आहे. १७ जून रोजी मध्य प्रदेशातील होशंगबाद िजल्ह्यातील इटारसी रेल्वेस्टेशनातील आरआरआई (रुटीन रिले इंटरलाॅकींग सिस्टम) यंत्रणेस आग लागली होती. तेव्हापासून उत्तर भारताकडे जाणार्‍या येणार्‍या गाड्या ठप्प आहेत. गेल्या सात िदवसात लांब पल्ल्याच्या तब्बल ९६ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी मुंबईत पावसामुळे लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा मोठा खोळंबा झाला होता. ती वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. मात्र इटारसीच्या आग दुर्घटनेमुळे मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. उत्तर भारतात जाणार्‍या आणि येणार्‍या रेल्वेगाड्या सिग्नल यंत्रणा जळाल्यामुळे मॅन्युअली चालवल्या जात आहेत. त्यामुळे शेकडो एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. इटारसीच्या दुर्घटनेमुळे उत्तर भारतातील गाड्यांना फटका तर बसला आहेच पण, भुसावळ, मनमाड, नागपूर, िशर्डी मार्गावरच्या पॅसेंजर गाड्यांना बसला आहे. कोल्हापूर, पुण्याहून सुटणार्‍या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याचा उत्तर भारताशी असलेला रेल्वे संपर्क जवळजवळ ठप्प झाल्यात जमा आहे.

गुरुवारच्या रद्द एक्स्प्रेस गाड्या
- एलटीटी - हबीबजंग. - कोल्हापूर - धनबाद. - एलटीटी-वाराणसी कामायनी. - नागपूर-जयपूर.
- एलटीटी - हबीबजंग - अमरावती- जबलपूर - एलटीटी -हरिव्दार. - सीएसटी -जबलपूर गरीबरथ. - एलटीटी -गोरखपूर. - एलटीटी - बिहार. - इटारसी - नागपूर - हजरत निजामुद्दीन - कोल्हापूर. - नागपूर- भुसावळ. - गोरखपूर - एलटीटी - वाराणसी - एलटीटी कामायनी एक्सप्रेस. - वाराणसी- सीएसटी महानगरी एक्सप्रेस. - लखनऊ - पुणे - राजेंद्रनगर- एलटीटी. - कालका - साईनगर(शिर्डी). - जबलपूर - अमरावती. - प्रतापगड - एलटीटी उद्योगनगरी एक्सप्रेस. - रक्सूल - एलटीटी जनशताब्दी - नागपूर -इटारसी पॅसेंजर. - भुसावळ - अहलाबाद पॅसेंजर - इटारसी - भुसावळ पॅसेंजर. - कटनी - भुसावाळ पॅसेंजर. - भुसावळ - इटारसी पॅसेंजर .
- सीएसटी - अमृतसर - एलटीटी - मुज्झपरपूर - पुणे - जम्मू तावी झेलम एक्सप्रेस. - सीएसटी - वाराणसी महानगरी एक्सप्रेस. - एलटीटी- राजेंद्रनगर. - अमरावती - जबलपूर. - एलटीटी-आग्रा कॅन्टोनमेंट लष्कर एक्सप्रेस. - एलटीटी - वाराणसी. - वाराणसी - एलटी - एलटीटी- अहलाबाद दुरांतो. - सीएसटी - लखनऊ पुष्पक एक्सप्रेस. - एलटीटी- राजेंद्रनगर. - सीएसटी - छाप्रा. - भुसावळ -इटारसी पॅसेंजर. - भुसावळ -अहलाबाद पॅसेंजर. - नागपूर -इटारसी - भुसावळ- नागपूर - हबीबगंज - सीएसटी स्पेशल. - अमृतसर -सीएसटी. - मुझ््झपूर - एलटीटी - जम्मू तावी झेलम -पुणे - हबीबगंज -एलटीटी - जबलपूर -अमरावती - वाराणसी -एलटीटी - हरिव्दार - एलटीटी. - जबलपूर -सीएसटी गरिबरथ - गोरखपूर- एलटीटी - राजेंद्रनगर- एलटीटी - इटारसी - भुसावळ पॅसेंजर. - कटनी -भुसावळ पॅसेंजर. - इटारसी - नागपूर पॅसेंजर. - जयपूर -नागपूर.

रेल्वेमंत्र्यांची बैठक
मुंबईतशक्रवारी पाणी तुंबून लोकलचा अभूतपूर्व खोळंबा झाला होता. सदर घटना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चांगलीच मनावर घेतली आहे. लोकल गाड्यांना पावसाळ्यात येणार्‍या समस्यांबाबत प्रभु यांनी रविवारी मुंबईत एक बैठक बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. यात रेल्वे यंत्रणेतील बिघाडाबाबतही चर्चेची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...