आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगर मोनालीचे शॉर्ट ड्रेसवरी‍ल फोटो इंस्टाग्रामवर झाले शेअर; फीमेल फॅनने केली कमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीव्ही अॅक्ट्रेस निया शर्मानंतर पॉपुलर सिंगर मोनाली ठाकूर ही 'स्लट शेमिंग'मुळे चर्चेत आली आहे. एका सोशल मीडिया यूजरने मोनालीच्या फोटोजवर कमेंट केली होती. त्यावर मोनालीने सडेतोड उत्तर दिले आहे.

'बद्री की दुल्हनिया' आणि 'सवार लूं' सारखे हिट सॉन्ग गायिल्यानंतर मोनालीने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे शॉर्ट ड्रेसवरील फोटोज शेअर केले होते. त्यावर तिच्या एका फीमेल फॅनने हरकत नोंदवली आहे. ती बाब मात्र मोनालीला चांगलीच जिव्हारी लागली आहे.

वाचा, मोनालीच्या फॅनने काम केली कमेंट... 
- मोनालीच्या फीमेल फॅनने लिहिले की, 'कलर्स चॅनलवरील 'रायझिंग स्टार'मध्ये तुझे काम कौतुकास्पद आहे. पण, तुझा ड्रेसिंग सेन्स मला खटकला. तु अत्यंत तोकडे कपडे परिधान करते.' 
- 'तू शोमध्ये पालकांप्रमाणे स्पर्धकांना मार्गदर्शन करते. तुला विनंती आहे की, जरा आपल्या  ड्रेसवर फोकस करावा. कारण कोट्यावधी प्रेक्षक तुला पाहात असतात.'

मोनाली ठाकूर का संतापली...? 
- फीमेल फॅनला रिप्लाय देताना मोनाली ठाकूर हिने लिहिले की, 'तुमच्या सारख्या मूर्खाला ब्लॉक करण्याआधी मी सांगू इच्छीते की, माझे डोके तुमच्याप्रमाणे ‍विचार करत नाही.' 
- माझे तोकडे कपडे तुम्हाला खटकत असतील तर ती तुमची विकृती आहे.
- तुम्ही तुमची 'सभ्यता' तुमच्याजवळच ठेवा.

दरम्यान, मोनाली सध्या फेमस म्युझिशियन शंकर महादेवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत कलर्स चॅनलवर प्रसारित होणार्‍या 'रायजिंग स्टार' प्रोग्राममध्ये जज करत आहे.

निया शर्माच्या बोल्ड अंदाजावरही आले होते कमेंट्स
- काही दिवसांपूर्वी आशियातील 50 सर्वाधिक सेक्सी लेडीजमध्ये थर्ड रँकवर टीव्ही अॅक्‍ट्रेस निया शर्मा हिचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता.
- त्यावर नियाच्या बोल्‍ड अंदाजावर फॅन्सीनी वाईट कमेंट्‍स केले होते. 
- या कमेंट्‍सचा आपल्यावर काहीही फरक पडत नसल्याचे नियाने उत्तर दिले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सिंगर मोनाली ठाकूरचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...