आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे पोलिस दलातील \'सिक्रेट सुपरस्टार\', वर्दी नव्हे \'मेरी आवाज ही पहचान है\'...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव पोलिस दलात कार्यरत असलेला संघपाल तायडे... - Divya Marathi
जळगाव पोलिस दलात कार्यरत असलेला संघपाल तायडे...

मुंबई- पोलिस दलातील लोक आपल्या कडक आणि दमदार आवाजासाठी ओळखले जातात. मात्र, महाराष्ट्र पोलिस दलातील एक कर्मचारी सध्या आपल्या मधुर आवाजामुळे प्रसिद्ध होत आहे. त्याच्या गळ्यातून निघणारा प्रत्येक शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसातच त्याची गाणी यू-ट्यूब आणि फेसबुकवर हिट झाली आहे. त्याचे गाणे ऐकणा-या लोकांचे म्हणणे आहे की, जर त्याला योग्य प्लॅटफॉर्म मिळाला तर तो बड्या बड्या सिंगर्संना टक्कर देऊ शकतो. एवढेच नव्हे तर आता कॉन्स्टेबलचे अधिकारी आणि स्थानिक लोत त्याला बॉलिवूडमध्ये ट्राय करण्याचा सल्ला देत आहेत. लहानपणापासूनच बनायचे होते सिंगर...

 

- आम्ही बोलतोय जळगावमधील पोलिस मुख्यालयात तैनात कॉन्स्टेबल संघपाल तायडेबाबत. संघपालला त्याचे सहकारी पोलिस कर्मचारी आवाजामुळे ओळखतात.
- संघपालने सांगितले की, मला लहानपणापासूनच गायक बनायचे होते. मात्र, परिस्थितीने पोलिस दलात जावे लागले. 
- संघपाल वर्ष 2008 मध्ये पोलिस दलात भरती झाले. वर्दी चढविल्यानंतरही संघपालने गाणे सोडले नाही. आता त्याच्या जादूई आवाजाने जळगावला वेड लावले. आता तो महाराष्ट्राला दिवाना बनवायला सज्ज झाला आहे.
- लोक आता गायक संघपाल म्हणून त्याला ओळखू लागले आहेत.
- संघपालने सांगितले की, मी कधीही संगीताचे शास्त्रयुक्त शिक्षण घेतले नाही किंवा कोणी गुरूही नाही. मी रेडिओ, टीव्हीवर लागणा-या गाण्यावरून रियाज सुरू केला आणि आज माझा आवाजच माझी ओळख बनली आहे. 

 

सोशल मीडियात व्हायरल झाले गाणे- 

 

- काही दिवसापूर्वी संघपाल गाणे गात होता आणि याच दरम्यान त्याच्या एका फ्रेंडने त्याचा व्हिडिओ बनवला आणि यू-ट्यूबवर अपलोड केला.
- हा व्हिडिओ यू-ट्यूबसह अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. संघपालचे गाणे ऐकणारे त्याची तारीफ व कौतूक करताना थकत नाहीयेत. 
- गाण्याशिवाय संघपालला अॅक्टिंगचा सुद्धा शौक आहे. त्याने अनेक स्टेज प्लेमध्ये अॅक्टिंग केली आहे. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, संघपालचे आणखी काही फोटोज ...

 

शेवटच्या दोन स्लाईडवर पाहा, संघपाल यांच्या आवाजातील दोन सुंदर गाणी...

बातम्या आणखी आहेत...