आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ए मेरे वतन के लोगों...\' हे गाणे माझ्याकडून काढून घेतले- सुमन कल्याणपूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गायिका सुमन कल्याणपुर यांचे संग्रहित छायाचित्र)

नांदेड- प्रख्यात गायिका सुमन कल्याणपुर यांनी 'ए मेरे वतन के लोगो' या गीताबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सुमन कल्याणपूर यांनी म्हटले आहे की, 1964 मध्ये पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरू यांच्यासमोर हे गीत गाण्यासाठी मला बोलावण्यात आले होते. त्यामुळे या गीताची मी रिहर्सलही केली होती. मात्र, व्यासपीठाच्या मागे जेव्हा मी पोहचले तेव्हा मला सांगण्यात आले की, या गाण्याऐवजी तुम्ही इतर गाणे गा. ते गाणे मी गाऊ नये असे कोणाला वाटले व ते गीत माझ्याकडून का काढून घेतले ते मला आजपर्यंत कळाले नाही असेही कल्याणपूर यांनी म्हटले आहे.
50 वर्षांनंतर खुलासा - नांदेडमध्ये आयोजित आषाढी महोत्सवादरम्यान सुमन कल्याणपुर यांनी बोलताना 50 वर्षापूर्वीच्या घटनेचा खुलासा केला. या गाण्याने नुकतीच 50 वर्षे पूर्ण केली आहेत. जीवनातील आपल्या महत्वपूर्ण घटनांबाबत बोलताना म्हणाल्या, मला लहानपणापासूनच संगीत व गाण्याची आवड होती. कलकत्यातून मुंबईत आल्यावर गायन क्षेत्रात मी स्थिरावले. सन 1964 मध्ये मला जेव्हा पंडित नेहरू यांच्यासमोर 'ए मेरे वतन के लोगो' हे गीत गाण्याची संधी मिळणार असे कळले तेव्हा माझा आनंद गगनात मावेत नव्हता. मात्र जेव्हा हे गीत गाण्यासाठी व्यासपीठाच्या मागील बाजूस गेली तेव्हा मला हे गाणे गाण्यापासून रोखले गेले. तसेच या गाण्याऐवजी दुसरे गाणे गाण्यास सांगितले. कल्याणपूर पुढे म्हणतात, 'मेरे वतन के लोगों' माझ्याकडून काढून घेणे माझ्यासाठी धक्का होता. ती बाब आजही मला छळते. तसेच हे गाणे काढून घेण्याचे कारण मला अद्यापही मिळाले नाही.
हेे गाणे प्रसिद्ध गायिका व भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायले व ते अजरामरही झाले आहे. सुमन कल्याणपूर यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख लता मंगेशकर यांच्याकडे असण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहेत सुमन कल्याणपूर - सुमन कल्याणपूर बॉलिवूडची प्रसिद्ध व लोकप्रिय गायिका राहिल्या आहेत. जुन्या काळातील त्यांची गाणे आजही लोकांच्या ओठात असतात. यात ना तुम जानों न हम, दिल गम से जल रहा है, मेरे संग गा, मेरे महबूब न जा, जो हम पे गुजरती है, बहना ने भाई की कलाई में, आदी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत व हिट केली आहेत.