आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्‍याने मुलाच्‍या नावे केली होती अब्‍जावधींची कंपनी, आता दारोदार भटकण्‍याची आली वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 हजार कोटी रुपयांच्‍या रेमंडगृपच्‍या मालकांवर आज पायी फिरण्‍याची वेळ आली आहे. - Divya Marathi
12 हजार कोटी रुपयांच्‍या रेमंडगृपच्‍या मालकांवर आज पायी फिरण्‍याची वेळ आली आहे.
मुंबई- भारताच्‍या टॉप ब्रँडमध्‍ये समावेश असलेल्‍या रेमंड या कंपनीचे मालिक डॉ. विजयपत सिंघानिया यांच्‍या कुटुंबात सध्‍या जोरदार आर्थिक कलह सुरु आहे. सिंघानिया यांनी आरोप केला आहे की, त्‍यांच्‍या मुलाने त्‍यांना अक्षरश: रस्‍त्‍यावर आणले असून त्‍यांच्‍यावर दारोदार भटकण्‍याची वेळ आणली आहे.
 
मुंबईमध्‍ये प्रसिध्‍द होणा-या वृत्‍तपत्राने दावा केला आहे की, सिंघानियांच्‍या मुलाने त्‍यांच्‍याकडून गाडी आणि ड्रायव्‍हरही काढून घेतले आहेत. सिंघानियाच्‍या वकिलांनी सांगितले आहे की, ते सध्‍या प्रचंड आर्थिेक संकटात असून एका भाड्याच्‍या घरात राहत आहेत. 

मुलाच्‍या नावावर संपत्‍ती करणे पडले महागात 
- विजयपत सिंघानिया यांनी सांगितले की, 'त्‍यांनी त्यांचे सगळे शेअर मुलाच्‍या नावावर केले. असे करणे हीच त्‍यांची मोठी चुक होती.' 
- एकेकाळी भारतातील सर्वाधिक श्रीमंतामध्‍ये समावेश असलेले सिंघानिया सध्‍या दक्षिण मुंबईमधील ग्रँड पराडी सोसायटीमध्‍ये एका भाड्याच्‍या घरात राहत आहेत. 
- स्‍वत:च्‍या या दुर्दशेसाठी सिंघानिया यांनी त्‍यांचा मुलगा आणि रेमंड कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना जबाबदार धरले आहे.   
- याविरोधात सिंघानिया यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. मलबार हिलमधील 36 मजली अलिशान इमारत जेके हाऊसमध्‍ये जागा मिळावी अशी विनंती त्‍यांनी केली आहे. 
-  1960 मध्‍ये जेके हाऊस बांधण्‍यात आले होते. तेव्‍हा ते 14 मजल्‍यांचे होते. नंतर त्‍यातील डुप्‍लेक्‍स रेमंडची सहाय्यक कंपनी पश्‍मीना होल्डिंग्‍सला देण्‍यात आले होते. 2007मध्‍ये कंपनीने या इमारतीचे पुननिर्माण केले. 
-  मात्र करारानूसार हा डुप्‍लेक्‍स फ्लॅट विजयपत सिंघानिया, त्‍यांचा भाऊ अजयपत सिंहानियांची पत्‍नी विणा देवी, त्‍यांचा मुलगा अनंत आणि अक्षयपत यांना मिळायला हवा होता. 5,185 स्‍क्‍वेअर फुटचा हा फ्लॅट आहे. याची साधारण किंमत 9,000 रुपये पर स्‍क्‍वेअर फुट एवढी आहे. 
- जेके हाऊसमधील आपल्‍या हिश्‍यांसाठी विणा देवी, अक्षयपत आणि अनंत यांनी यापूर्वीच याचिका दाखल केली आहे. 
- विजयपत सिंघानिया यांच्‍या वकीलांनी कोर्टात सांगितले की, विजयपत यांनी आपली संपूर्ण संपत्‍ती मुलाच्‍या नावावर केली. त्‍यांनी मुलाच्‍या नावावर 1000 कोटी रुपयांचे शेअर केले. मात्र मुलाने त्‍यांच्‍याकडून गाडी, घर आणि ड्रायव्‍हरही काढून घेतले. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा या अब्‍जाधीश कुटुंबाचे फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...