आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी ब्रिटनमधून स्पेशल प्लेनने इंडियात येत होता हा अब्जाधिश, मुलाने काढले घराबाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कधी काळी ब्रिटनमधू स्पेशल प्लेनने इंडियात येणारे रेमंड ग्रुपचे मालक विजयपत सिंघानिया आज पायी ‍फिरण्यास मजबूर आहेत. मुकेश अंबानी यांच्या 'एंटीलिया'पेक्षाही उंच जेके हाऊसमध्ये राहाणारे 78 वर्षीय अब्जाधिशाला आज मुंबईत एका सोसायटीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहाण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या परिस्थितीला मुलगा गौतम सिंघानिया यांना जबाबदार ठरवले आहे.

फिल्म इंडस्ट्री या अब्जाधिशाचा होता दबदबा...
- विजयपत यांचा विमान आणि फिल्म इंडस्ट्रीत चांगलाच दबदबा होता. जगभरात शुटिंग आणि शर्टिंगसाठी प्रसिद्ध ब्रँड रेमंड कंपनी 1925 मध्ये सुरु केली होती. पहिले रिटेल शोरूम 1958 मध्ये त्यांनी मुंबईत सुरु केले होते.
- विजयपत यांनी 1980 मध्ये कंपनीचे नेतृत्त्व स्विकारले होते. 1986 मध्ये प्रीमियम ब्रॅंड पार्क एव्हेन्यू लॉन्च केला होता.
- ओमानमध्ये त्यांनी कंपनीचे पहिले शोरूम 1990 मध्ये सुरु केले होते. 1996 मध्ये देशात एअर चार्टर सर्व्हिस सुरु केली होती. स्पोर्ट स्पिरिट ठेवणारे  विजयपत यांनी 1988 मध्ये लंडन ते मुंबईपर्यंत एकट्याने हवाई उड्डान पूर्ण केली.
- पद्मभूषण विजयपत यांनी ‘एन अँजल इन कॉकपिट’ हे पुस्तक लिहिले आहे.

काय आहे वडील- मुंबईमधील वाद...?
- विजयपत सिंघानिया यांनी सांगितले की, 'त्‍यांनी त्यांचे सगळे शेअर मुलाच्‍या नावावर केले. असे करणे हीच त्‍यांची मोठी चूक ठरली.'
- एकेकाळी भारतातील सर्वाधिक श्रीमंतामध्‍ये समावेश असलेले सिंघानिया सध्‍या दक्षिण मुंबईमधील ग्रँड पराडी सोसायटीमध्‍ये एका भाड्याच्‍या घरात राहत आहेत.
- स्‍वत:च्‍या या दुर्दशेसाठी सिंघानिया यांनी त्‍यांचा मुलगा आणि रेमंड कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना जबाबदार धरले आहे.
- याविरोधात सिंघानिया यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मलबार हिलमधील 36 मजली अलिशान इमारत जेके हाऊसमध्‍ये जागा मिळावी अशी विनंती त्‍यांनी केली आहे.
- 1960 मध्‍ये जेके हाऊस बांधण्‍यात आले होते. तेव्‍हा ते 14 मजल्‍यांचे होते. नंतर त्‍यातील डुप्‍लेक्‍स रेमंडची सहाय्यक कंपनी पश्‍मीना होल्डिंग्‍सला देण्‍यात आले होते. 2007मध्‍ये कंपनीने या इमारतीचे पुननिर्माण केले.
- मात्र करारानूसार हा डुप्‍लेक्‍स फ्लॅट विजयपत सिंघानिया, त्‍यांचा भाऊ अजयपत सिंहानियांची पत्‍नी विणा देवी, त्‍यांचा मुलगा अनंत आणि अक्षयपत यांना मिळायला हवा होता. 5,185 स्‍क्‍वेअर फुटचा हा फ्लॅट आहे. याची साधारण किंमत 9,000 रुपये पर स्‍क्‍वेअर फुट एवढी आहे.
- जेके हाऊसमधील आपल्‍या हिश्‍यांसाठी विणा देवी, अक्षयपत आणि अनंत यांनी यापूर्वीच याचिका दाखल केली आहे.
- विजयपत सिंघानिया यांच्‍या वकीलांनी कोर्टात सांगितले की, विजयपत यांनी आपली संपूर्ण संपत्‍ती मुलाच्‍या नावावर केली. त्‍यांनी मुलाच्‍या नावावर 1000 कोटी रुपयांचे शेअर केले. मात्र मुलाने त्‍यांच्‍याकडून गाडी, घर आणि ड्रायव्‍हरही काढून घेतले.

पुढील स्लाइडवर पाहा अब्जाधिश फॅमिलीचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...