आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singing Programme Of Gulam Ali Is Arranged In Mumbai Again

गुलाम अली "घरवापसी' करणार, साहिब इलायसीच्या चित्रपटात गाणार देशभक्तिपर गीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अलीकडेच झालेल्या वादानंतर प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली पुन्हा एकदा मुंबईत येण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक साहिब इलायसीच्या "घरवापसी' या चित्रपटात अली यांनी देशभक्तिपर गीत गायिले आहे. या गाण्याचे लाँचिग २९ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी इलायसीने त्यांना निमंत्रण दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेने प्रचंड विरोध केल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तसेच अली यांनी आपले भारतातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलले होते. आता दिग्दर्शक साहिब इलायसी "घरवापसी' हा चित्रपट घेऊन येत आहेत. यात अली यांनी "अपनी मिट्टी की खुशबू है रगो में यह बसी है ' हे गीत गायिले आहे. या चित्रपटात अालोकनाथ आणि फरिदा जलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या कार्यक्रमाला सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रम शांततेत पार पडेल
याआधी झालेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुलाम अली संगीत विमोचन कार्यक्रमाला नक्की हजेरी लावतील. या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

साहिब इलायसी.. शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
पाकिस्तानी कलाकारांना मुंबई बोलावून कार्यक्रम घेण्यास शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. गेल्या वर्षी पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांना मुंबईतील कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले होते. त्यानंतर गुलाम अली यांच्याही कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. आता अली यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.