आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळंबोलीजवळ भीषण अपघातात 7 ठार, मानखुर्दजवळ गॅस टँकर कोसळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सायन-पनवेल मार्गावर पुलावरून टँकर कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. हा टँकर गॅसचा असून पुलावरून कोसळल्यानंतर त्याचा स्फोट झाला आणि त्याला भीषण आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले आहेत. एलपीजी गॅसचा टँकर मानखुर्दजवळ पुलावरून कोसळल्याने मोठा स्फोट झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सहा ते सात तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, सायन-पनवेल हायवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक नवी मुंबईकडून वळविण्यात आली आहे.

कळंबोलीजवळ भीषण अपघातात 7 ठार
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कळंबोली नजिक सुमो आणि ट्रकच्या धडकेत सात जण ठार झाले आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. सुमो कराडहून ठाण्याकडे जात होती. सुमोत दहा जण होते. कळंबोलीजवळ जेथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग संपतो त्‍याच ठिकाणी सुमोने ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की 7 जण जागीच ठार झाले. अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्‍यांना जवळच्‍या एमजीएम रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ट्रक चालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.