आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss:युवीची वहिणी झाली एव्हीक्ट, स्मोकिंग-ड्रीकींगची आहे शौकीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस'च्या घरातून युवराजची वहिणी आकांक्षा शर्मा एव्हीक्ट झाली आहे. रिपोर्ट्सनुसार ऑडियन्सच्या वोट्सच्या आधारे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दुसऱ्या आठवड्यात आकांक्षाबरोबरच मनवीर गुर्जर, मनु पंजाबी, मोनालिसा, गौरव चोप्रा, नितिभा कौल आणि रोहन मेहरा नॉमिनेट झाले होते.

आकांक्षा म्हणाली, सासूमुळे नवऱ्याला सोडले
आकांक्षाचा विवाह 2014 मध्ये युवीचा भाऊ जोरावर सिंगबरोबर झाला होता. पण त्यांचे नाते 4 महिनेही टिकले नाही. बिग बॉसमध्ये एंट्री करताना सलमानला स्वतःची कथा सांगताना आकांक्षा इमोशनल झाली होती. लग्नानंतर एवढी वाइट अवस्था झाली होती, की जगण्यापेक्षा मेलेलं बरं असे आकांक्षा म्हणाली होती. वयाच्या 23 व्या वर्षीच लग्न झाले पण युवराजच्या भावात कधी लाइफ पार्टनरही दिसला नाही, किंवा मित्रही दिसला नाही, असे आकांक्षाने सांगितले होते.
पतीपासून विभक्त होण्यास सासू म्हणजे युवराजची आई शबनम जबाबदार असल्याचे आकांक्षा म्हणाली होती. सासूच्या वाईट वर्तणुकीमुळे ती एवढी परेशान होती, की तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला असे तिने सांगितले. सासरच्या मंडळींकडून घटस्फोटाशिवाय दुसरे काहीही हवे नसल्याचे ती म्हणाली.

अशी लाइफ जगते आकांक्षा
25 वर्षांची आकांक्षा पतीपासून दूर आई वडिलांबरोबर गुडगाव येथे राहते. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट karmasphere नुसार ती एक्सप्लोरर, रायटर आणि फिटनेस फ्रीक आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्पष्ट होते की, तिला सिगारेट, दारु आणि पार्ट्यांची आवड आहे. तिने स्मोकिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओही पोस्ट केले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आकांक्षाच्या पर्सनल लाइफचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...