आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SIT Submits Report In SC Against Kripashankar Singh's Property

कृपाशंकर यांचे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - कृपाशंकर सिंह यांच्‍या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी विशेष तपास पथकाने चौकशी अहवाल आज सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केला आहे. विशेष तपास पथकाने एका सिलबंद पाकीटात अहवाल न्‍यायालयाला दिला. मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आठ आठवड्यानंतर एसआयटीने तपास पूर्ण करुन अहवाल सादर केला आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले होते. आता कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे.
या आधी 13 मार्च रोज मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांना कृपाशंकर सिंह यांच्‍या मालमत्तेबाबत स्‍वतंत्र तपास पथक नेमून चौकशी करण्‍याचे आदेश दिले होते. त्‍यांच्‍या मालमत्तेबाबत सर्व आवश्‍यक कागदपत्रे तसेच इतर लेखी पुरावे गोळा करण्‍याची सुचना न्‍यायालयाने केली होती.

सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्‍या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाविरोधात उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.