आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाहीरांचे कार्य मोठे, राष्ट्रवादीचा विरोध नाही, अजित पवारांनी पाडले अाव्हाडांना एकाकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण'ला तीव्र विरोध करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतांशी राष्ट्रवादी काँग्रेस बिलकुल सहमत नाही. आव्हाडांचे मत वैयक्तिक असून पुरंदरे यांचे कार्य निश्चितच मोठे असल्याची पावती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी िदली. उशिरा का हाेईना पवारांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे या भूमिकेवरून अाव्हाड पक्षात एकाकी पडले आहेत.
मुंबईच्या आगीत वीरमरण पत्करलेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना गुरुवारी िसद्धिविनायक मंदिर समितीतर्फे अजित पवारांच्या हस्ते अार्थिक मदत देण्यात अाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘पुरंदरे यांचे कार्य मोठे असून त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल व्याख्याने देण्याचे काम केले आहे. त्यांची अनेक व्याख्याने मी ऐकली आहेत. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला द्यायचा, हा राज्य सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे त्याला विरोध करायचे काहीच कारण नाही. प्रत्येक पक्षात वेगवेगळ्या व्यक्तींची वेगळी मते असू शकतात. त्याचप्रमाणे आव्हाडांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मताचं राष्ट्रवादी पक्ष समर्थन करत नाही’, असे पवारांनी स्पष्ट केले.

शिवशाहीर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयाला अाव्हाडांनी सुरुवातीपासूनच तीव्र विराेध केला अाहे. संभाजी ब्रिगेडच्या मदतीने राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन अाव्हाड हा विराेध दर्शवत अाहेत. इतकेच नव्हे, तर पुरंदरेंबद्दल प्रक्षाेभक भाषा वापरत अाहेत. सांगलीतील कार्यक्रमात याच विषयावर राडा झाल्यानंतर अाव्हाडांवर जातीय भावना दुखावल्याचा गुन्हाही दाखल झालेला अाहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही अाव्हाडांच्या मताचे समर्थन केले हाेते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत याच विषयावर आव्हाड तसेच राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता.