मुंबई - रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील एका फार्महाऊसवर माजी पोलिस अधिकार्याच्या निवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुजरा पार्टीवर शनिवारी मध्यरात्री रायगड पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी 12 मुलींसोबतच 14 पुरुषांना ताब्यात घेतले आहे.
खालापूरजवळील कोलथे या गावात एका फार्म हाऊसवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकत ही पार्टी उधळून लावली. पोलिसांनी यापूर्वी अनेक पाटर्य़ांवर छापा घातला आहे. मात्र, आता एका निवृत्त पोलिस अधिकार्याच्याच मुजरा पार्टीवर पोलिसांनीच धाड टाकल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सर्व मुली या 20 ते 30 या वयोगटातील आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मुली या शहरातीलच आहेत की त्या इतर ठिकाणांहून येथे आल्या ? याचाही पोलिस शोध घेत आहेत. तसेच या पार्टीवर किती रुपयांचा चुराडा झाला याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.