आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत घरगुती सिलिंडरचा स्फोट, सहा जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलमध्ये सिलिंडर स्फोटाची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी विक्रोळीच्या पार्क साइट भागातील वर्षानगरमध्ये एका घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सहाजण जखमी झाले असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.