आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Six Year Old Schoolboy Sexually Abused By Woman Bus Attendant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत महिला अटेंडंटकडून 6 वर्षांच्‍या मुलाचे लैंगिक शोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील एका नामांकित शाळेच्‍या महिला अटेंडंटवर एका 6 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याचा खळबळजनक आरोप करण्‍यात आला आहे. शाळेच्‍या एका विद्यार्थ्‍याचे तिने शोषण केल्‍याचा आरोप संबंधित विद्यार्थ्‍याच्‍या पालकांनी केला आहे. परंतु, शाळेने याप्रकरणाची दखल घेतली नाही. तसेच चौकशी करण्‍यासही नकार दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगा घाटकोपर येथे राहणारा आहे. कुर्ल्‍यातील एका शाळेत तो शिकतो. स्‍कूल बसमध्‍ये तैनात महिला अटेंडंट त्‍याचे लैंगिक शोषण करायची. तसेच तिच्‍या मित्रांकडेही त्‍याला नेत होती. तेदेखील त्‍याचे शोषण करायचे, असा आरोप त्‍याच्‍या पालकांनी केला आहे.

शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनाचा पालकांच्‍या आरोपांवर विश्‍वास नाही. व्‍यवस्‍थापनाने चौकशीस नकार दिला असून पोलिसच तपास करतील, असा पावित्रा घेतला आहे.