आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षानंतर अमेरिकेहून परतेल्या मुलाला घरात दिसला अाईचा सापळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक छायाचित्र. - Divya Marathi
सांकेतिक छायाचित्र.
मुंबई- एक वर्षापासून अमेरिकेत असलेला मुलगा मुंबईतील परतला तेव्हा त्याला घरात चक्क अापल्या अाईचा सापळा दिसून अाला. ही धक्कादायक घटना अाेशिवारा भागात घडली. ६३ वर्षीय अाशा केदार साहनी असे या महिलेचे नाव अाहे.

वेल्स काॅल्ड साेसायटीत राहणाऱ्या अाशा यांचा अायटी इंजिनिअर मुलगा ऋतुराज साहनी हा गेल्या एक वर्षापासून अमेरिकेत पत्नीसाेबत राहात हाेता. ताे नुकताच मुंबईत परतला हाेता. दहाव्या मजल्यावर अापल्या फ्लॅटजवळ ताे गेला असता घराचा दरवाजा त्याला बंद दिसला. गेल्या अनेक दिवसांपासून घर बंद असल्याचे दिसत हाेते. दार ठाेठावले तरी अातून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ऋतुराजने अापल्या जवळील चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला तर त्याला धक्काच बसला. घरात त्याला अाईचा सापळाच दिसून अाला, त्यासाेबत काही कपडेही हाेते. या घटनेची माहिती कळाल्यानंतर पाेलिसांनी फ्लॅटमध्ये येऊन पाहणी केली.

अाशा यांच्या मृत्यूनंतर घरात सडून त्यांच्या मृतदेहाचा सापळा झाला हाेता, हे पाहून पाेलिसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे शेजारी राहणाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधीही कधी अाली नाही. भूक व अशक्तपणामुळे अाशा यांचा मृत्यू झाला असावा, असा पाेलिसांना संशय अाहे.

पाेलिसांच्या माहितीनुसार, अाशा साहनी यांचा मृत्यू किमान चार महिन्यापूर्वी झाला असावा. दराेडेखाेरांकडूनही त्यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात अाहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात अाला अाहे तसेच त्याची फाॅरेन्सिक चाचणीही करण्यात येणार अाहे. सध्या केवळ अाकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे.

अाईला वृद्धाश्रमात जायचे हाेते : ऋतुराज
अाशा साहनी यांचे पती केदारनाथ यांचे निधन २०१३ मध्ये झाले हाेते. या साेसायटीत त्यांच्या नावावर सुमारे सहा काेटी रुपये किमंतीचे दाेन फ्लॅट अाहेत. ऋतुराजने सांगितले, ‘एप्रिल महिन्यात अापण अाईशी अखेरचे बाेललाे हाेताे. तेव्हा अाईने अापण वृद्धाश्रमात राहायला जाणार असल्याचे सांगितले हाेते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...