आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत देह व्यापार चालणाऱ्या ठिकाणी सापडला मानवी सांगडा; 13 वर्षांपुर्वीचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी एक सेक्स रॅकेट उघडकीस आणल्यानंतर हे खून प्रकरण समोर आले आहे. - Divya Marathi
पोलिसांनी एक सेक्स रॅकेट उघडकीस आणल्यानंतर हे खून प्रकरण समोर आले आहे.

मुंबई- पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका महिलेने पतीची खून करुन 13 वर्ष त्याचा मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता. घरात कुंटणखाना चालवण्याच्या प्रकरणात महिलेला अटक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सरिता भारती असे आरोपी महिलेचे नाव आहे. सरिता देहविक्रीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारावर सोमवारी पोलिसांनी सरिताच्या घरावर छापा मारुन चार महिलांची सुटका केली.

 

त्यावेळी आपण जिथे छापेमारीची कारवाई केली तिथे मानवी सांगाडे सापडतील याची कल्पनाही पोलिसांना केली नव्हती. मंगळवारी रात्री पोलिसांनी मारलेल्या दुसऱ्या छाप्यामध्ये त्यांना घरातील सेप्टिक टाकीमध्ये मानवी सांगाडा सापडला. हा सांगाडा सरिताच्या पतीचा असून तिने 13 वर्षांपूर्वी पतीचा खून करुन मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता. 

 

बोईसरमधील गांधीपाडा भागातील राहत्या घरातून सरिता देहविक्रीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी छापा मारला त्यावेळी पोलिसांनी चार महिलांची सुटका केली व सरितासह तिथे आलेल्या ग्राहकांना अटक केली.  सरिता फक्त देहविक्रीच्या रॅकेटमध्येच नसून तिने स्वत:च्या नवऱ्यासह अनेकांचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

 

त्याआधारवर पोलिसांनी मंगळवारी मारलेल्या दुसऱ्या छाप्यामध्ये घराच्या टाकीमध्ये मानवी सांगाडा सापडला. पोलिस चौकशीत सरिताने खून केल्याची कबुली दिली. तेरा वर्षांपूर्वी आपण खून केला व मृतदेह बाथरुममधल्या सेप्टिक टाकीमध्ये ठेवल्याचे तिने सांगितले. नवरा सहदेव झोपेमध्ये असताना सरिताने डोक्यावर घाव घालून त्याचा खून केला होती. 

 

का केला खून?

- सरिताने सांगितले की, तो तिला कुंटणखाना चालविण्यापासून रोखत होता. तिने आपल्या प्रियकरासोबत त्याचा खून केला. 

 

तंत्रसाधनेच्या नावाखाली मुलींना ओढले जाळ्यात

- सरिता तंत्रसाधनेच्या नावाखाली मुलींना यात ओढत होती. ती जादु-टोणा करत असल्याचे सांगत होती. 

- ती अनेकदा कोंबड्या बळी मागत होती व कच्चे मांस खात होती. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...