आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात युवकांना कौशल्य विकासाचे धडेशापूरजी पालनजी, गोदरेज कंपन्यांचा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील तरुणांना कौशल्यनिपुण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला. याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातील तरुणांना कौशल्य विकासाचे धडे देण्यासाठी गोदरेज आणि शापूरजी पालनजी या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. तरुणांना प्रशिक्षण देऊन या कंपन्या रोजगारही उपलब्ध करून देतील. कौशल्य विकास विभागाचे सचिव एम.एस. संधू यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली.

७० टक्के नाेकरीची हमी
राज्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कौशल्य आधारित शिक्षणाची वानवा असल्याने केवळ शिक्षणाच्या आधारावर नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यासाठी सुतारकाम, लोहारकाम, प्लम्बिंग, कॅटरिंग आणि हॉटेल सेवा अशा विविध कामांचे प्रशिक्षण देण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. या अंतर्गत ७० टक्के तरुणांना नोकरीची हमी दिली जाणार आहे.
दाेन महिने प्रशिक्षण
{ विविध विषयांचे प्रशिक्षण दोन किंवा तीन महिने. श्रेणीनुसार प्रमाणपत्र.
{ शहरी व ग्रामीण भागांत विविध कारागीर, कलाकारांना प्रशिक्षण.
{ यासाठी राज्य सरकारचा कंपन्यांशी सामंजस्य करार.
{ प्रशिक्षणाचा काही खर्च राज्य सरकार, उर्वरित प्रशिक्षणार्थींचा. सोबत नोकरीची हमी.
महाकौशल्य वेबसाइट
महाकौशल्य नावाने एक वेबसाइट राज्य सरकार तयार करणार असून त्यावर प्रशिक्षण घेणा-या सर्व तरुणांचा बायोडाटा कंपन्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही वेबसाइट लवकरच सुरू केली जाणार आहे.
बांधकाम, फर्निचरचे तरुणांना प्रशिक्षण
ग्रामीण तरुणांना बांधकाम व फर्निचर क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल. सध्या इतर राज्यांतील कामगारांकडून ही कौशल्याची कामे करून घ्यावी लागतात. यामुळे रोजगार मिळेल, कर्जाचे ओझे टळेल व शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील.