आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या घराबाहेर फॅन्सला मारहाण, फोटो घेण्यावरून बॉडीगार्डने मारली थप्पड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मुंबईत सलमान खानच्या बॉडीगार्डने सलमानच्या घराचा फोटो घेत असलेल्या फॅनला थप्पड मारल्याचे पुढे आले आहे. Photo courtesy- ABP.)
मुंबई- बॉलिवूड ऍक्टर सलमान खानच्या घराबाहेर त्याच्या एका फॅनला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानच्या घराबाहेर त्याचा एक फॅन फोटो काढत होता. त्यावेळी त्याच्या एका बॉडीगार्डने या फॅनला थोबाडीत मारली.
काय आहे प्रकरण-
- न्यूज चॅनल एबीपीच्या वृत्तानुसार, सनाउल्ला रहमान नाम नावाचा एका व्यक्ती मंगळवारी सायंकाळी सलमानच्या मुंबईस्थित गॅलेक्सी अपार्टमेंटची मोबाईलद्वारे फोटो घेत होता.
- याबाबत सांगितले जात आहे की, हा तरूण सलमानचा चाहता असल्याने त्याच्या घराबाहेर त्याचा फोटो टिपण्यासाठी घुटमळत होता.
- त्याचवेळी सलमान खानच्या एका बॉडीगार्डने रहमानला पकडले व सर्वांसमोर एक थोबाडीत मारली. माध्यमाच्या कॅमे-यात हा सर्व प्रकार कैद होत असल्याचे पाहून बॉडीगार्डने त्याला एका वाहनाच्या आड नेले व तेथेही त्याला भरपूर मारहाण केली.
- रहमान तेथून पळून जाऊ लागला. तरीही बॉडीगार्डने त्याला पकडून आणखी मारहाण करण्यात आली.
- याबाबत सलमान खानची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सलमान खानच्या हिट अॅंड रन प्रकरणी आज निकाल येणार आहे.
काय म्हणणे आहे रहमानचे?
- रहमान विले पार्ले येथे राहणारा आहे. माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले की, आज मला सुट्टी असते. त्यामुळे मी येथे फिरायला आलो होतो. येथे आल्यावर विचार केला की सलमान खानचा फोटो घ्यावा. मात्र मला मारण्यात आले. मी कोणताही नियम मोडला नाही की गुन्हा केला नाही.
बातम्या आणखी आहेत...