आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात सलग सातव्या सत्रात घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिकेच्या सकल उत्पादनाचे (जीडीपी) आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने गुरुवारी सकाळी बाजारात उत्साही वातावरण होते. मात्र, दुपारी एचएसबीसीकडून जुलैमधील आयपीएमआय निर्देशांकाचे आकडे 50.1 असे घसरलेले आले आणि बाजारातील उत्साहावर विरजण पडले. अखेरच्या सत्रात झालेल्या मोठय़ा विक्रीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 28.51 अंकांच्या घसरणीसह 19,317.19 वर बंद झाला. निफ्टी 0.50 टक्के घटीसह 5,727.85 पातळीवर स्थिरावला.

रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, आयटीसी, एसबीआय, कोल इंडिया, भेल, टाटा स्टील आणि हिंदाल्को यांच्या विक्रीने सेन्सेक्सच्या घसरणीला वेग आला. त्यातच एचडीएफसी बँक, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयसीआयसीआय बँक या समभागांचीजारदार विक्री झाल्याने घसरणीत भर पडली.


सोने स्वस्त
ठोक सराफा व्यापारी आणि साटेबाजांनी जोरदार नफेखोरी केल्याने सोने तसेच चांदीत मोठी घसरण झाली. मुंबई सराफ्यात सोने तोळ्यामागे 240 रुपयांनी स्वस्त होऊन 28,415 रुपये झाले. चांदी किलोमागे 505 रुपयांनी घसरून 41,950 झाली. दिल्लीत मात्र सोने तोळ्यामागे 475 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी सोन्याने चार महिन्यांच्या उच्चांकासह 29 हजारांचा टप्पा ओलांडला होता. लंडन बाजारात सोने 1323.16 डॉलर प्रतिऔंस असे स्थिर राहिले.

एनएसईएलच्या व्यवहारावर टाच
काही विशिष्ट समभागात एकदम खरेदी आणि अचानक विक्रीचे प्रकार घडल्याने नॅशनल स्पॉट एक्स्चेंजमधील व्यवहार थांबवण्यात आले आहेत. याचा सेन्सेक्स, निफ्टीवर परिणाम होणार नसल्याचे सेबी व सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केले. सेबी अधिक चौकशी करत आहे.