आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीओटी’च्या रस्त्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती, सार्वजनिक बांधकाम खात्याचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जून महिन्यापासून जीप, कार व एसटीला ५३ टोल नाक्यांवरुन वगळण्याबरोबरच राज्यातील १२ टोलनाके कायम बंद करण्याचा निर्णय युती सरकाने नुकताच घेतला होता. या निर्णयापाठोपाठ राज्य टोलमुक्त करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. राज्यात यापुढे बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या नव्या रस्त्यांमधून छोट्या वाहनांना वगळणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत बाेलताना गुरुवारी केली.

राज्यातील रस्त्यांच्या परिस्थितीबाबत विधानसभेत नियम २९३अन्वये चर्चा सुरू असताना बांधकाममंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यात भविष्यात बीओटी तत्त्वावर अनेक रस्ते बांधण्यात येणार आहेत. या रस्त्यांवरून मोठ्या वाहनांवर टोल आकारला जाणार असून छोट्या वाहनांना टोलमधून वगळणार येईल.

छोट्या वाहनांना टोलमधून वगळल्यामुळे निधीमध्ये तफावत येत असेल तर त्या रकमेची भरपाई केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून करेल, तरीही खर्च भागत नसेल तर राज्य सरकार विशेष निधी देईल.’