आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या टोलनाक्यावर छोट्या वाहनांना सूट मिळणार : पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील काही टाेलनाक्यांवरून छाेट्या वाहनांना (लाइट व्हेइकल) सूट देण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतला आहे. आता नव्या टाेलधाेरणानुसार राज्यात यापुढे जे रस्ते बांधण्यात येतील, तेथील टाेलनाक्यांवरही छाेट्या वाहनांना टाेलमुक्तीतून सूट दिली जाईल, अशी घाेषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

जनतेला टाेलमुक्त करू, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीदरम्यान दिले हाेते. मात्र सत्तेवर अाल्यानंतर संपूर्ण टाेलमुक्तीला बगल देऊन अंशत: टाेलमुक्तीवर फडणवीस सरकारने भर दिला आहे. हे सरकार लवकरच नवे टाेलधाेरण मांडणार आहे. त्यात ‘बीआेटी’ तत्त्वावर बांधण्यात येणार्‍या नव्या रस्त्यांवरही छाेट्या वाहनांना टाेलमुक्ती मिळणार असल्याचे पाटील म्हणाले. याशिवाय नव्या टोलनाक्यांवर सेन्सर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित नाक्यावरूनवाहन गेल्यानंतर टाेलच्या वसुलीची तेवढी रक्कम वजा हाेईल. या माध्यमातून वाहनांची संख्या आणि कंत्राटदाराने वसुली केलेल्या रक्कमेचा तपशील सरकारकडे राहील व भ्रष्टाचाराला चाप बसेल, असे पाटील म्हणाले. नव्या टोल नाक्यावर सुरुवातीला १५ दिवस वाहनांची मोजणी करून टोलची रक्कम ठरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...