आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मोटारींना टोलमुक्ती, उद्या नवी अधिसूचना; हायकोर्टात सरकारची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील ५३ टोलनाक्यांवरील टोलच्या कक्षेतून एलएमव्ही म्हणजेच लहान मोटारींना सूट देण्याबाबत तसेच १२ टोल नाके कायमस्वरूपी बंद करण्याबाबत नवी अधिसूचना मंगळवारी जारी केली जाईल, अशी माहिती सोमवारी राज्य सरकारच्या वतीने साेमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.

राज्यातील १२ टोल नाके कायमस्वरूपी बंद करणे तसेच ५३ टोल नाक्यांवरील टोलच्या कक्षेतून छोट्या मोटारींना वगळण्याबाबत राज्य सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान घेतलेल्या निर्णयाविरोधात सायन पनवेल टोलवेज या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली.

या सुनावणीदरम्यान राज्याचे महाधिवक्ते अनिल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबतची अधिसूचना या महिन्यात व्यपगत होत असल्याने ही अधिसूचना नव्याने काढली जाणार आहे. या अधिसूचनेद्वारे पूर्वीप्रमाणेच पुढील सहा महिन्यांसाठी कार, रिक्षा, जीप, टॅक्सी आणि मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी गाड्यांना टोलमधून सुट देण्यात येणार आहे. या आधीच्या सुनावणीदरम्यान या निर्णयामागील आपली भूमिका मांडताना राज्य सरकारने सांगितले होते की, लहान मोटारींना टोलमधून सूट देण्याच्या निर्णयामुळे टोल नाके चालवणाऱ्या कंपन्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन अाहे. मात्र, अजूनही त्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू असून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...