आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी- राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घाणाघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रातील मोदी सरकारने आणलेली स्मार्ट सिटी योजना ही योजना अत्यंत फसवी आहे. केंद्र सरकार याद्वारे राजकीय खेळ करीत आहे असा घाणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे.
राज्यातील, देशातील महानगरपालिका आपल्या परिसरात अनेक चांगल्या योजना राबवत आहे. मात्र, केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठीच स्मार्ट सिटी योजना राज्यांवर थोपवली जात आहे. या योजनेबाबत अनेक राज्यांना शंका आहेत. मी सरकारी अधिका-यांकडून माहिती घेतली आहे, ही केवळ राजकीय धूळफेक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेला आमचा विरोध राहील असेही राज यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेची खिल्ली उडवत ती कशी फसवी आहे याचा पाढा वाचला. राज म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था म्हणजेच महापालिका यांना स्वतंत्र अधिकार दिले आहेत. अशा स्थानिक स्वराज संस्थांना सशक्त करण्याऐवजी दुबळे बनविले जात आहे. केंद्राने महापालिकेत अजिबात लुडबुड करू नये व स्थानिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार व प्रायोरिटीनुसार काम करून दिले पाहिजे. देशातील, राज्यांतील विविध शहरे स्मार्ट करणे हे त्या त्या देशाचे, राज्याचे काम आहे. ते कर्तृत्त्व त्यांनी पार पाडले पाहिजे. मात्र, स्मार्ट सिटी योजनेद्वारे कंपनी स्थापन करून स्वत:चे इंटरेस्ट जपणे हाच हेतू यामागे दिसत आहे. स्मार्ट सिटी योजनेबाबत मोदी सरकारचा हेतू स्वच्छ नाही असेही राज यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे एकसंध राज्य राहिले पाहिजे असे मंत मांडत स्वंतत्र विदर्भाच्या भाजपच्या भूमिकेवर टीका केली. राज्याचे अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांच्या भूमिकेमागचा बोलविता धनी कोण आहे हे तपासून पाहावे लागेल असे मत मांडत याप्रकरणी भाजपकडे बोट दाखवले.
बातम्या आणखी आहेत...