आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smart Device Ready For Woman Security, Switch On Message Go To Family

स्मार्ट उपकरण महिलांच्या सुरक्षेसाठी सज्ज, स्वीच दाबताच संदेश पोहोचेल कुटूंबापर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुरक्षेसाठी अनेक अॅप असले तरी संकटकाळी हल्लेखोर मोबाइल हाती घेऊ देईल की नाही याची खात्री नसते. शिवाय तसा प्रयत्न केल्यास इजाही केली जाऊ शकते. त्या मुळे आता कीचेनसारखेच हातात सहज मावणारे आर्महर हे स्मार्ट उपकरण महिलांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहे. या उपकरणाचे स्वीच दाबताच मदत मागणारा संदेश कुटुंबीयांच्या मोबाइलवर धडकेल. शिवाय लोकेशनही त्यांना कळू शकेल.

इनोव्हेटिव्ह आयडियल्स अँड सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि. या कंपनीने ‘आर्महर’ बाजारात आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते ‘आर्महर’चे अनावरण करण्यात आले.

अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आर्महर महिला सुरक्षेसाठी उपयुक्त असल्याचे कंपनीचे मकसूद डी. शेख यांनी सांगितले. अशी उत्पादने स्रीची गरज ठरत आहेत, असे अमृता यांनी म्हटले आहे.

कसे काम करते?
मोबाइलला हात न लावता आर्महरचे स्वीच दाबताच महिलेने निवडलेल्या कुटुंबीयांना 'हेल्प मी, आय अॅम इन ट्रबल' असा संदेश देणारे पाच एसएमएस व पाच ई-मेल्स महिला, मुलीचे गुगल मॅप लोकेशन, तारीख व वेळेसह पाठवले जातात. फेसबुकवरही संदेश अपडेटसारखा झळकतो.

खास वैशिष्ट्य : * कीचेनप्रमाणे हातात ठेवता येते, हँडबॅगला लावू शकता.
*पॅनिक स्विचच्या सहाय्याने ब्ल्यूटूथद्वारे कोणत्याही मोबाईलशी कनेक्ट होते.

कंट्रोल रूमशी संपर्क : संकटकाळी पोलिसांना माहिती मिळून कारवाई करता यावी यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क करणे हा उपकरणाचा पुढचा टप्पा आहे.

कसे काम करते?
मोबाइलला हात न लावता आर्महरचे स्वीच दाबताच महिलेने निवडलेल्या कुटुंबीयांना 'हेल्प मी, आय अॅम इन ट्रबल' असा संदेश देणारे पाच एसएमएस व पाच ई-मेल्स महिला, मुलीचे गुगल मॅप लोकेशन, तारीख व वेळेसह पाठवले जातात. फेसबुकवरही संदेश अपडेटसारखा झळकतो.