आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात महाराष्ट्रातल्या एसएमई कंपन्यांची 831 काेटी रु.ची निधी उभारणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई शेअर बाजारातील व्यवहारासाठी लघु अाणि मध्यम उद्याेगांकरिता उभारण्यात अालेले स्वतंत्र व्यासपीठ या क्षेत्रातील कंपन्यांसाठी फायद्याचे ठरत अाहे. एसएमई शेअर बाजाराचा उंबरठा अाेलांडण्याचा कल वाढत असून या मंचावर महाराष्ट्रातल्या ८६ कंपन्यांनी ८३१.४२ काेटी रुपयांचा निधी समभाग विक्रीतून यशस्वीरीत्या उभारला अाहे.  

मुंबई शेअर बाजारात १३ मार्च २०१२ रोजी लघु आणि मध्यम उद्योगातील कंपन्यांसाठी एसएमई मंच सुरू झाला. गेल्या पाच वर्षांत या मंचावर ३०७ कंपन्यांची नोंदणी झाली. मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर महाराष्ट्रातल्या ८६ कंपन्यांनी नोंदणी करून प्राथमिक समभाग (आयपीओ) विक्रीतून ८३१.४२ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरातील आणखी ५० कंपन्या एसएमई मंचावर नोंदणी करतील, असा अंदाज मुंबई शेअर बाजारातील एसएमई एक्स्चेंजचे प्रमुख डॉ. अजय ठाकूर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.  


लघु आणि मध्यम उद्योगातील कंपन्यांसाठी स्वतंत्रपणे सुरू झालेल्या  स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी करून समभाग विक्री केल्याचा फायदा कंपन्यांना होत आहे. अगोदर नोंदणी झालेल्या कंपन्यांना मिळालेले यश बघून आता इतर कंपन्यादेखील हाच मार्ग अवलंबत आहेत. राज्यातल्या कंपन्यांशी संपर्क साधून शेअर बाजारात नोंदणी करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जागृती करण्यात येत आहे. त्यामुळे कंपन्यांची संख्या वाढत असल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.  


लघु अाणि मध्यम उद्याेगातील कंपन्यांना व्यवसाय सुरू करताना निधी उभारण्यासाठी बँकांवर अवलंबून राहावे लागत हाेते. परंतु अाता त्यांना इक्विटी फंडामुळे मदत हाेत अाहे. नाेंदणी केल्यामुळे कंपन्यांचा ताळेबंद पारदर्शक हाेऊन त्याचा परिणाम नफा वाढण्यावर हाेत अाहे. एसएमई शेअर बाजारात नाेंदणी केल्याने प्रवर्तकांची विश्वासार्हता निर्माण हाेऊन अनाेंदणीकृत कंपन्यांच्या तुलनेत या कंपन्यांच्या ग्राहकांची (क्लायंट) संख्या वाढत असल्याचे दिसून अाले. त्यामुळे कंपन्यांनी शेअर बाजारात नाेंदणी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.  


अाणखी २५ कंपन्या 

ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अनुसरून उद्याेजक नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करीत अाहेत. या नव्या प्रकारच्या उद्याेगांना एसएमई मंच अाधार ठरला अाहे. महाराष्ट्रातल्या कंपन्यांमध्ये अधिक जागरूकता असल्याने त्या एसएमई शेअर बाजारामध्ये स्वारस्य दाखवत अाहेत. त्यामुळे अाणखी २५ कंपन्या एसएमई शेअर बाजारात येण्याची शक्यता असून त्यात अहमदनगर, अकाेला, अमरावती, काेल्हापूर या भागातील कंपन्यांचा समावेश असण्याचा अंदाज एसएमई तज्ज्ञ महावीर लुणावत यांनी व्यक्त केला.  

जागृती करणार

लहान कंपन्यांना एसएमई शेअर बाजारात नाेंदणी करण्यास उद्युक्त करण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेतला अाहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात राज्य सरकारच्या सहयाेगातून कंपन्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष माेहीम राबवण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...