आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रालयात छोटे मोबाइल, नव्या सिमकार्डचा वापर वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाेटाबंदीनंतर नवे चलन मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता जाणवत अाहे. काही अधिकारी आपल्या नेहमीच्या महागड्या माेबाइलला बाजूला ठेवून एक- दाेन हजारांत मिळणारे छाेटे माेबाइल व नवे सिम कार्ड वापरताना दिसत अाहेत. अचानक त्यांच्या वागण्यात झालेल्या या बदलावर संशय व्यक्त हाेत अाहे. ‘काळा पैसा पांढरा करण्यासाठीच्या खटाटाेपातील संवाद गुप्त राखण्यासाठी तर हा बदल नाही ना?’अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली अाहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर वर्षानुवर्षे दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले. मात्र, राज्यात सत्ता बदलानंतरही काही सनदी अधिकारी जुन्याच पदांवर कायम अाहेत. त्यांचे नव्या सत्ताधाऱ्यांसाेबतच काही बड्या उद्याेगपतींशीही सुमधुर संबंध असल्याचे बोलले जाते. राजकीय नेत्यांच्या संपत्तीची नेहमी चर्चा होते. मात्र, सनदी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेविषयी फारशी वाच्यता हाेताना दिसत नाही. मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्र्यांप्रमाणे ‘लॅव्हिश’ राहत असतात, त्यावरून त्यांच्या ‘उत्पन्ना’चा अंदाजही बांधता येऊ शकताे. मात्र, नाेटाबंदीच्या निर्णयानंतर या अधिकाऱ्यांमध्ये फारच ‘गरिबी’ अाल्याचे चित्र दिसून येत अाहे. एरवी अॅपल, एस वन, गुगल िपक्सल असे महागडे स्मार्टफाेन मोबाइल वापरणारे अधिकारी अाता चक्क एक- दाेन हजारांत मिळतील असे काळ्या रंगाचे छोटे मोबाइल वापरत असल्याचे एक- दाेन अाठवड्यांपासून दिसत अाहे.

काॅल ट्रेसच्या भीतीने त्यागले स्मार्टफाेन
मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यासह महसूल विभाग, झोपडपट्टी पुनवर्सन योजना, म्हाडा, गृहनिर्माण, िशक्षण अादी विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी नोटबंदीनंतर अचानक छोेटे मोबाइल व नवे सिमकार्ड वापरू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या अाहेत. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारतर्फे मोबाइल क्रमांक दिला जातो आणि त्याचे बिलही सरकारच देते. मात्र, हा अधिकृत फाेन नंबर काही गाेपनीय संवादात अडचणीचा ठरताे. नाेटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्याचे लाेन मंत्रालयापर्यंतही पाेहाेचले अाहे. काही ‘मालदार’ अधिकारी दलालांमार्फत हा खटाटाेप करत असल्याची चर्चा अाहे. या दलालांशी झालेला संवाद उघड हाेऊ नये, अापले काॅल ट्रेस हाेऊ नयेत म्हणून हे अधिकारी नवीन सिम कार्ड व साधा माेबाइल वापरत असल्याची चर्चा अाहे.

धनिकांना अावडे नवे सिम कार्ड
नोटाबंदीनंतर नव्या सिमकार्डची विक्री अचानक वाढल्याची माहिती माेबाइल दुकानदारांनी दिली. कनिष्ठ व मध्यम वर्गापेक्षा श्रीमंत वर्गातील ग्राहकांकडून नव्या सिम कार्डची मोठी मागणी असल्याचे सिम कार्ड विक्रेत्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...