आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smriti Irani Case Police To Produce Accused Before Court

कोल्‍हापूर \'फॅब इंडिया\'तही बनवला युवतीचा व्हिडिओ; आरोपींना पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी गोव्यातील कलंगूट बीचजवळील फॅब इंडिया स्टोअर्समध्ये स्मृती इराणी आल्या असताना... - Divya Marathi
शुक्रवारी गोव्यातील कलंगूट बीचजवळील फॅब इंडिया स्टोअर्समध्ये स्मृती इराणी आल्या असताना...
कोल्हापूर/ पणजी- गोव्यातील फॅब इंडियाच्या ट्रायल रूममध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी छुपा कॅमेरा शोधून काढल्यानंतर या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. या प्रकरणातील चार आरोपींना आज गोव्यातील म्हापसा कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आता फॅब इंडियाच्या बड्या अधिका-यांची चौकशी करीत आहेत. दरम्यान, गोव्यापासून जवळच असलेल्या कोल्हापूरमधील फॅब इंडिया स्टोअरमध्ये एका कर्मचा-याने ग्राहक महिलेचा मोबाईलवरून व्हिडिओ बनविल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सेल्समन प्रकाश इस्पुले याला पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी संबंधित सेल्समनला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित सेल्समनने चेंजिग रूमच्या दरावाजाखाली आपला मोबाईल टाकून एका महिलेचा व्हिडिओ बनविला होता.

7 देशांतील 75 शहरांत परसला आहे फॅब इंडियाचा व्यवसाय-
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांनी फॅब इंडियाच्या ट्रायल रूममधील छुपा कॅमेरा शोधून काढल्यानंतर फॅब इंडिया कंपनी चर्चेत आली आहे. फॅब इंडियाची जगभरातील 7 देशांत 75 शहरांत व्यवसाय परसला आहे. तर 75 शहरात जवळपास 187 स्टोअर्स आहेत. 1960 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे जॉन बिशेल हे संस्थापक आहेत. फॅब इंडिया कंपनी भारतात वेगवेगळ्या भागांत केवळ हाताने शिवलेले रेडिमेड कपडे, फर्निचर आणि होम डेकोरेशन वस्तू तयार करते. तसेच आपल्या स्टोअर्सच्या माध्यमातून विकते. फॅब इंडियाचे सीईओ विलियम बिशेल यांचे म्हणणे आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या स्टोर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. मात्र, यापूर्वी कर्मचा-यांबाबत कोणतेही तक्रार आलेली नाही.

कॅम-यातून महिलांवर नजर- मागील काही दिवसात सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे महिलांच्या प्रायव्हसीवर गदा आल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
3 एप्रिल 2015 : कोल्हापूरमधील फॅब इंडियाच्या एका स्टोअरमध्ये 26 वर्षाच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर एका कर्मचा-याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर चेंजिंग रूममध्ये महिलेचा व्हिडिओ बनविल्याचा आरोप आहे.
23 मार्च 2015: इंटरनॅशनल ब्रॅड van heusen च्या दिल्ली स्थित स्टोअरमध्ये एका महिला एक्‍झिकेटिव्हचा व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणातही स्मार्ट फोनचा वापर केला होता.
8 फेब्रुवारी 2015: मुंबईतील अंधेरी स्थित एका हॉटेलमधील वॉशरूममध्ये एका युवतीने हिडन कॅमेरा पकडला होता.
4 जानेवारी 2015 : मुंबई पोलिसांनी एका 18 वर्षाच्या मुलाला आपल्या शेजारी राहणा-या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना व्हिडिओ काढल्याच्या प्रकरणावरून अटक केली होती.
2 ऑक्टोबर 2014 : मुंबईतील एका डॉक्टरला आपल्या हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या सहकारी महिला डॉक्टरचा अंघोळ करताना व्हिडिओ बनवताना पकडले होते. त्याला अटक करण्यात आली होती.
10 ऑगस्ट 2014 : बेंगळुरुमधील एका हॉटेल मॅनेजरला महिलांच्या वॉशरूममध्ये कॅमेरा लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
7 ऑगस्ट 2014: बेंगळुरूमधील एका स्टोरमध्ये महिलेने ट्रायल रूममध्ये लावलेला छुपा कॅमेरा पकडून दिला होता.
पुढे वाचा, टॉयलेट किंवा चेंजिंग रूममध्ये हिडन कॅमेरा असेल तर कसे ओळखाल...