आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Smriti Irani Complains About Camera Pointed At Changing Room In Goa

मंत्री स्मृती इराणींनी पकडला चेंजिंग रूममधील छुपा कॅमेरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्यातील एका शोरूमच्या चेंजिंग रूममध्ये लावलेला छुपा कॅमेरा शुक्रवारी खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीच पकडला. पती झुबिन यांच्यासोबत स्मृती गोव्यात सुटी घालवत आहेत.
कंडोळीमध्ये दुपारी १२.४५ वाजता फॅब इंडियाच्या शोरूममध्ये त्या गेल्या. ट्रायल रूममध्ये जाताच त्यांचे लक्ष दरवाजाच्या समोर लागलेल्या कॅमेऱ्याकडे गेले. व्हेंटिलेशनच्या नावाखाली दारात छिद्र पाडण्यात आले होते. स्मृती यांनी झुबिन यांना माहिती देऊन स्थानिक आमदार मायकेल लोबो यांना फोन केला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोरूमचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक उमेश गांवकर म्हणाले, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग जप्त केले असून, व्हिडिओत कपडे बदलणारे लोक स्पष्ट दिसतात. कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग स्टोअरच्या व्यवस्थापकाच्या कॉम्प्युटरमध्ये साठवले जात होते. पोलिसांनी स्मृती व आधी चेंजिंग रूममध्ये गेलेल्या महिलांचे जबाब पीडित म्हणून नोंदवले. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी बंगळुरूत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.