आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याच्याशी खेळतात चिमुकली मुले, या लहान जीवामुळे जातात हजारो जणांचे प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जर तुम्हाला कोणी विचारले की जगातील सगळ्यात खतरनाक जीव कोणता, तर तुम्ही कदाचित शार्क मासा अथवा मगरीचे नाव घ्याल. पण तुम्ही जो विचार करत आहात तो चुक आहे. वाघ, शार्क मिळून जितक्या व्यक्तींचा जीव घेत नाही तितके जीव हा प्राणी घेतो. हा प्राणी आहे गोगलगाय, अनेक लहान मुले या प्राण्याबाबत खेळतात. 
 
यामुळे आहे खतरनाक
- वाघ आणि शार्कने हल्ला केल्याने वर्षभरात सरासरी 120 जणांचा मृत्यू होतो. तर गोगलगायमुळे पसरणाऱ्या रोगामुळे 10 हजार जणांचा मृत्यू होतो.
- गोगलगाय ही मानवी जीवनास अत्यंत धोकादायक मानली जाते. अर्थात डासांमुळे होणारे आजार त्यापेक्षा जास्त आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजाराने दरवर्षी 7.25 लाख जणांचा मृत्यू होतो.
- हे आकडे बिल गेट्स यांनी जारी केले होते. एक डासही किती खतरनाक असतो, हे ते सांगू इच्छित होते. डास आणि अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांविषयी जागरुकता निर्माण झाली असली तरी गोगलगायमुळेही आजार पसरतात हे आजही अनेकांना माहित नाही. 
- गोगलगायमध्ये आजार पसरवणारे जीवाणू नसल्यास ती धोकादायक नसते पण अशा जीवाणूने प्रवेश केल्यावर ती धोकादायक ठरते. 
- सेर्कारी नावाचा परजीव शिस्टोसोमियासिस नावाचा गंभीर आजार पसरवतो. त्यामुळे जगभरात दरवर्षी 10 हजार जणांचा मृत्यू होतो आणि लाखो लोकांना हा आजार होतो.   
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि गोगलगायमुळे पसरणाऱ्या आजारांविषयी माहिती
 
बातम्या आणखी आहेत...