आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरक्षक नव्हे, हे तर नरभक्षक; सगळ्यांना बीफ खाण्याचा हक्क - रामदास आठवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठवले म्हणाले की, गोरक्षणाच्या नावाखाली देशात सुरु असणारा हिंसाचार योग्य नाही. - Divya Marathi
आठवले म्हणाले की, गोरक्षणाच्या नावाखाली देशात सुरु असणारा हिंसाचार योग्य नाही.
मुंबई/नागपूर- तथाकथित गोरक्षक हे नरभक्षक असून सगळ्यांना बीफ खाण्याचा हक्क असल्याचे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे बीफ नेत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या घटनेबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 
 
मोदी सरकारची प्रतिमा बिडवत आहेत गोरक्षक
- गोरक्षक हे मोदी सरकारची प्रतिमा बिडवत आहेत. त्यामुळे त्यांना कडक शिक्षा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
- आठवले म्हणाले, प्रत्येकाला बीफ खाण्याचा हक्क आहे. शेळीचे मांस महाग असल्यानेच लोक बीफ खातात. नागपूरात घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. गोरक्षणाच्या नावाखाली कोणालाच नरभक्षक बनण्याचा हक्क नाही.
- गोरक्षकांना कायदा हातात घेण्याचा हक्क नाही. त्यामुळे त्यांना कडक शिक्षा करण्याची गरज आहे.
 
नो टॉलरन्स पॉलिसी
- देशात नागपूरसारख्या घटना घडु नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने नागपूर घटनेत सामील असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
- नागरिकांना शांततेचे आवाहन करतानाच आठवले म्हणाले की, मोदी सरकारची अशा व्यक्तींविरोधात नो टॉलरन्स पॉलिसी आहे.
बातम्या आणखी आहेत...