आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Health: For Child Better Education She Sale Her Womb

सामाजिक आरोग्य: मुलांच्या शिक्षणासाठी तिने विकले गर्भ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुलाच्या शिक्षणासाठी तिने आपला गर्भ विदेशी दांपत्याला विकला आहे. यामागे तिचा एक उद्देश आहे तो म्हणजे आपल्या मुलाचे भविष्‍य उज्ज्वल रहावे.सरोगेट आईंच प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. एक उत्पन्नाचे साधन म्हणून ब-याचं स्त्रिया याकडे वळल्या आहेत. मात्र परिस्थितीच्या पुढे हतबल झालेल्या स्त्रियांही गर्भ विक्री करत असताना दिसत आहेत. विदेशात व भारतात मुलं न होणा-या दांपत्यांचा मुल प्राप्त करण्‍यासाठी भाड्यांने गर्भ विकले जाते. अमीर खान व किरण राव यांनी आपले मुल प्राप्तीसाठी सरोगेट गर्भाचा वापर केला होता.

मात्र गर्भ विक्रीतून पैसा मिळावा हाच उद्देश नाही. सीमा पाटील( येथे नाव बदलले आहे.) यांनी पहिल्यांदाच आपला गर्भ विकला आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्‍यासाठी तिने हे पाऊल उचलले आहे. सीमाच्या या निर्णयामुळे तिच्या मुलांना शिक्षणाची हमी मिळणार आहे. हा निर्णय घेण्‍यापूर्वी तिच्या एका मुलाला शाळेची परीक्षा शुल्क न भरल्याने शाळेतून काढण्‍यात आले होते. या घटनेने ती खूप दुखी झाली. भविष्‍यात असा प्रसंग पुन्हा आपल्या मुलांवर येऊ नये यासाठी ती प्रयत्न करत होती. तिन्ही मुलांचे वार्षिक शुल्क तीस हजार रूपये इतके आहे. यासाठी सीमाने बँकेतून कर्ज व नातेवाईकांकडे पैशांची मदत मा‍गितले होते.तिची ही शोधाशोध सुरू असताना तिच्या एका मैत्रींनीने गर्भ भाड्यांने देण्‍याची कल्पना सुचवले. पतीला आत्मविश्‍वासात घेऊन तिने आपले गर्भ भाड्याने दिला.

मुलांबरोबर बोलावे लागते खोटे
वाढते गर्भ पाहुन सीमाचे मुल त‍िला ने‍हमी प्रश्‍न विचारत असतात. पण त्यांना काहीतरी उत्तर देऊन शांत बसवत असल्याचे सांगितले. गर्भातील मुलासाठी तिला नियमित औषधोपचार घ्‍यावा लागत आहे. सीमाच्या गर्भात परदेशी दांपत्याचे आठ महिन्याचे जुळे बाळ वाढत आहेत.